खास पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechchha! International Women's Day

आज जागतिक महिला दिन! स्त्री वेगवेगळ्या (शारीरिक-मानसिक) अवस्था सोसून (देखील),  कधी त्याचे भांडवल न करता, ज्या-ज्या विविध अशा भूमिका ठरवून दिलेल्या असतात,  किंवा  ज्या-ज्या विविध अशा भूमिका वाट्याला आलेल्या असतात,  त्या अगदी (यशस्वीपणे) पार पाडीत असते, त्यालाच एक दुजोरा (म्हणून की काय!) 8 मार्च हा आजचा दिवस, जागतिक 'महिला दिन'! यामध्येच एखाद्या स्त्री च्या भूमिकेतील गमक दिसून येते! स्त्रीच्या अंगी निसर्गतःच मातृत्व आहे, माया आहे, ममता आहे! संगोपन हा गुण देखील तिच्या अंगी निसर्गतः च आहे. बहुतांशी (अख्खे कुटुंबच) एखाद्या आई/बहीण/सुनेच्या भोवताली, या ना त्या कारणाने फिरत असलेले आपण बहुतांशी पाहिलेले आहे. तिच्या शिवाय काही गोष्टी घरात, कधी कधी (आणि वेळेला!), सापडूच शकत नाहीत!😊 (हा अनेकांचा अनुभव आहे!)  कुठलीही (आई, बहीण, सून अशा) स्वरूपातील 'स्त्री', घरात नसेल तर घराला घरपण नसते. स्त्री कोमल असली तरी खंबीर असते! वेळोवेळी कणखर झालेली  तिला  जगाने पाहिलेले आहे! त्यामुळे, तिचे महत्व जाणून घेणे, लक्षात ठेवणे, आणि वेळोवेळी, तिच्या जगण्याला, आणि जपण्या...

एक तरी विरंगुळा पाहिजेच!

Maansala aayushyaat jagat astana, vividh naati nibhaavat astaana aani tyadvaare vividh ashi kaame karit astana kinva aplya lakshacha / lakshyancha shodh ghet astana ektari virangula kasa paahije he patvun denaari hi (vaachnyasathi / to read) Marathi Blog Post. Nakki vaacha aani share kara! 👍

माणसाला आयुष्यात जगात असताना विविध नाती निभावत असताना आणि त्याद्वारे विविध अशी कामे करीत असताना किंवा आपल्या लक्षच / लक्ष्याचा शोध घेत असताना एकतारी विरंगुळा कसा पाहिजे हे पटवून देणारी हि (वाचण्यासाठी / to read) मराठी ब्लॉग पोस्ट. नक्की वाचा आणि शेअर करा!👍

आपल्याला भावना आहेत तशा त्या पूर्ण करीत असतो, आपल्याला विचार हि आहेत त्यानुसार आपण वागत असतो. आपल्या काही गरजा आहे त्या पण आपण पूर्ण करीत असतो आणि आपले दैनंदिन कौटुंबिक, व्यावसायिक, प्रोफेशनल वगैरे जीवन आपण जगात असतो; पण तरीही कधी कधी किंवा काही काळ / कालावधी / मध्ये मध्येच
काही तरी हवे असल्यासारखे होत असते. आपल्या भावना, गरजा हि पूर्ण झाल्यानंतर हि मन कशासाठी उत्पन्न झालेले असते आणि ते नेमके काय आहे किंवा असते? याचा विचार आपल्याला कधी कधी पडत असतो.

👉 कंटाळा:

एखादी गोष्ट (काही वेळेसाठी किंवा खूप वेळेसाठी) कंटाळवा णी वाटणे 
सध्याच्या किंवा कधी कधी वाढलेल्या ताण-तणावाच्या स्थितीमध्ये, कधी कधी असे वाटते नको ते सतत काहीतरी मिळविण्याच्या उद्देशाने एखाद्या गोष्टीच्या मागे सतत धावत राहण्याचा कंटाळा आलाय. कधी कधी खरंच खूप कंटाळा येतो!
कुठेतरी शांत बसावे वाटते मनाच्या अगदी आवडीचे काहीतरी करत, काहीतरी खेळत किंवा काहीतरी पाहत! आणि ते खरेही आहे; कारण आपण ध्येयाच्या, काहीतरी गाठण्याच्या, काहीतरी त्याच त्याच गोष्टी करण्याच्या एवढे अधीन झालेलो असतो कि मन केव्हा उबगून जाते कळतच नाही! कधी कधी या धावपळीमध्ये किंचित काहीतरी चुकल्यासारखे वाटते! नक्कीच, काहीतरी (पैसा, पद, संपत्ती इत्यादी) मिळविण्याचा आपल्याला एवढा मोह झालेला असतो आणि एवढा नाद लागलेला असतो कि त्यामध्ये आपण थोडेसे थांबण्याचे, थोडासा विसावा घेण्याचे आणि मन जरा जास्तच उबगल्यासारखे करीत असेल तरीही थोडासा विरंगुळा करण्याचे आपण विसरलेले असतो.

👉 कशातच न रमणे:

आणि त्याच त्याच गोष्टी पुनः पुनः नकोश्या वाटणे 

👉 निराशा / नैराश्य:


👉 काहीतरी बदल हवा वाटणे:


👉 आपली गरज एखाद्या ठिकाणी न उरणे / आपली गरज संपणे:

👉अगदी याच्याच 

आपली सगळी कामे झालेली आहेत, कमावणे झाले आहे, नाती पण निभावत आहोत वगैरे; पण तरीही कधी कधी आपण कुठे जरा जास्तच हजर राहिलोत तर (काही वेळासाठी किंवा जास्त वेळासाठी) आपल्याला टाळले जाते त्यावेळेस आपल्याला दुसरा काही पर्याय नसतो. आपण कुठेतरी एवढे हजर राहत असतो कि समोरच्या व्यक्तीला जराही आपल्यापासून उसंत मिळत नसते आणि तेही कधी कधी आपल्याला (काही काळासाठी किंवा सदैव) उबगून जात असतात.

या दोन परिस्थिती आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात उद्भवत असतात.

यासंदर्भात आपले लहानपण आठवणे खूप आवश्यक आहे;

आपण जर आठवले तर, आपल्याला आपले लहानपणीचे घराबाहेर पडणे आठवेल. कशासाठी होते ते? म्हणजे

'आपले लहानपणी घराबाहेर पडणे कशासाठी होते?'

काही शोधण्यासाठी होते का? नाही. काही वस्तू मिळविण्यासाठी होते का? नाही. काही पैश्यासारखी वस्तू मिळविण्यासाठी होते का? नाही. फक्त बाहेर पडायचो आपण आणि त्यानंतर जे उपलब्ध असायचे ते खेळायचो, जे उपलब्ध असायचे ते पाहायचो वगैरे. मग त्यातून आपण मित्रांसोबत / मैत्रिणींसोबत मन भरून खेळायचो आणि मित्र / मैत्रिणींसोबत एखादी गोष्ट डोळे भरू पाहायचो आणि घरी परतल्या बरोबर लगेच झोपायचो. म्हणजे ताण तणाव वगैरे काही नसायचा आणि खेळल्याचे आणि एखादी गोष्ट किंवा अनेक गोष्टी मन भरून पाहिल्याचा आनंद असायचा! खेळण्याच्या गोष्टी मात्र आपण बरेच दिवस (म्हणजे मन भरेपर्यंत) करायच्या.

आपल्या लहानपणी आपण घराच्या बाहेर पडून कुठलीही गोष्ट करायची ती फक्त आणि फक्त आपल्या आवडीची असायची! उदा. खेळणे (खेळ पण आपल्या आवडीचेच असायचे ते कोणी इतर जणांनी लादलेले नसायचे हे विशेष! त्याही खेळांमध्ये काही खेळ असे असायचे कि त्यांना कुठलाही खर्च नसायचा उदा. विटीदांडू, चल्लस / चम्पू , पोहणे इत्यादी.)

ते झाल्यानंतर मात्र नंतर (मित्र / मैत्रिणींसोबत) कुठे नवीनच गोष्ट असायची! असे काहीसे आपले बालपण असायचे. जबाबदार्या आपण टाळू शकत नाहीत; कारण आता आपण काही लहान नाही आहोत, हे मान्य आहे पण थोडासा तरी असा वेळ काढायला हवा. सांगायचा उद्देश एवढाच आहे कि आपण या दोन गोष्टींत फरक केला पाहिजे:

१) अशा गोष्टी ज्या गोष्टीने (म्हणजे पैसा, पद वगैरे मिळवल्याने) आपल्याला बरे वाटते.

२) अशा गोष्टी ज्यांनी आपल्या मनाला बरे वाटते. (म्हणजे आपल्या सवयी, छंद आणि मिळणारा विरंगुळा)

प्रत्येकाचे आपापले आयुष्य आहे, प्रत्येकाच्या आपापल्या इच्छा-आकांक्षाही आहेत, प्रत्येकजण काही ना काहीतरी करतोय; म्हणजे हालचाल, आराम, संघर्ष, टाईमपास वगैरे. पण या सगळ्यांतूनही मन उबत असते... का बरे? आणि असे वाटते कि मनाला चांगली वाटणारी या अगोदरच्या सगळ्या गोष्टींपेक्षा कोणती तरी वेगळी गोष्ट किंवा कोणत्यातरी वेगळ्या गोष्टी करावी किंवा कराव्यात! आणि त्यातूनच उद्भवतो तो छंद, खेळ, मनोरंजन इत्यादी! यालाच आपण विरंगुळा म्हणत असतो! आणि हाच विरंगुळा आपल्याला मनाच्या उद्विग्न अवस्थेत थोडासा आराम, थोडासा दिलासा देत असतो! त्यामुळे व्यक्तीला एक विरंगुळा पाहिजेच किंवा विरंगुळ्याचे ठिकाण पाहिजेच; जेव्हा बोर होते, जेव्हा करमत नाही, जेव्हा (कधी कधी) घरात देखील आपण (काही वेळेसाठी - म्हणजे निगेटिव्ह वाटू देऊ नका; कारण बऱ्याच वेळा आपण घरात-घरात पण बसून राहिलो तर घरच्या इतर लोकांना ते नकोसे होते; कधी त्यांच्या प्रत्येक किंवा जास्तीत जास्त गोष्टींमध्येही यामुळे आपली नको असलेले आणि अनावश्यक लुडबुड होत असते आणि त्यामुळे ते वैताग तात. याला एकाचा पर्याय आहे - एखादे बाहेर असलेले विरंगुळ्याचे ठिकाण. म्हणजे चांगले हा! वाईट नाही!😊) नकोसे होतो इत्यादी अवस्थेंत. आणि अशा परिस्थितीत आपल्याला घरातले सुद्धा सगळेच नाकारतात.
असा हा विरंगुळा किंवा विरंगुळ्याचे ठिकाण नक्कीच छंदा द्वारे सुद्धा सापडू शकतो किंवा निर्माण होऊ शकतो: म्हणजे कुणाला पोहण्याचा छंद असला तर तो पोहण्याचे ठिकाण शोधू शकतो, कोणाला खेळण्याचा छंद असेल तर तो खेळण्याचे ठिकाण (इन डोर आणि आउट डोर म्हणजे करम, कबड्डी वगैरे) शोधू शकतो किंवा सापडू शकतो किंवा निर्माण करू शकतो इत्यादी. अशा वेळी असा हा विरंगुळा सुद्धा इतर सर्व गोष्टींसोबतच कामाला येऊ शकतो.
अशा स्थिती मध्ये मनाला विरंगुळा म्हणून पुरविणारी कुठलीही गोष्ट किंवा ठिकाण याची खूप मदत होते.

त्यामुळेच, माणसाकडे काहीही असले तरी, तो कुठेही असला तरी, त्याचे कोणतेही काम चालू असले तरी जेव्हा केव्हा मनाची उद्विन्ग्नता निर्माण होईल, जेव्हा केव्हा मनाला कंटाळा येईल, जेव्हा केव्हा मन निराश होईल, जेव्हा केव्हा मन एकटे पडेल तेव्हा तेव्हा... कुठल्या तरी छंदा च्या स्वरुपात, कुठल्याही व्यक्ती / नात्याच्या स्वरुपात, कुठल्या तरी मनोरंजन च्या स्वरुपात, कुठल्या तरी खेळाच्या स्वरुपात आणि 

माणूस २४ तास आनंदी राहू नाही शकत. माणूस सदा सर्वदा समाधानी नाही राहू शकत, माणूस कायम नेहमीसाठी त्याच त्याच गोष्टी नाही करू शकत, माणसासाठी काळ सदा सर्वदा तसाच नाही राहू शकत. काळ, काळानुसार स्थिती, परिस्थिती आणि माणसेही बदलतात.

या गोष्टी लक्षात घेता 

मनाला एक तरी विरंगुळा पाहिजेच!

(क्रमशः पोस्ट अपडेट करणे अजूनही चालू आहे)


मान्य आहे प्रत्येकजण आपापल्या इच्छा, अपेक्षा आणि महत्वकांक्षा यांसाठीच लढतोय , झगडतोय आणि प्रत्येक जन आपापल्याच कामात व्यस्त आहे . पण हे मात्र खरे आहे कि प्रत्येकाला एक मन आहे आणि त्या मनाचा आपला निराळाच विरंगुळा आहे . म्हणजे प्रत्येकाचे मन हे निराळ्याच गोष्टीमध्ये रमते . हे मन ज्या निराळ्या गोष्टीमध्ये रमते , ज्या निराळ्या गोष्टीमध्ये त्याला करमते ती गोष्ट म्हणजेच 'विरंगुळा !' हा … पण ती गोष्ट निराळी मात्र असली पाहिजे ! निराळी म्हणजे जी गोष्ट आपल्याकडून ठरलेली नसली पाहिजे . म्हणजे आपण ठरवतो कि मला हे व्हायचे आहे ते व्हायचे आहे , अशा गोष्टी म्हणजे आपण ठरवलेल्या गोष्टी. या गोष्टींमधून आपल्या समाधान मिळणार आहे हे आपल्याला माहित असते . पण एखादे आल्हाददायक गाणे कानांवर पडले कि आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो , आपल्याला आपला मनपसंद खेळ आपल्या सोबत्यांसोबत खेळायला भेटला कि एक वेगळीच मजा येते वगैरे.


Comments