घटना घडतात, कधी फार छोट्याश्या बदलाला कारणीभूत ठरतात तर कधी कधी एक मोठे साम्राज्य निर्माण करतात आणि कधी कधी संपूर्ण जीवनशैलीच नष्ट करून जातात. अनुभव येतात, आपल्याला खूप काही शिकवून जातात. क्षण उद्भवतात, कधी स्मितहास्य देतात कधी मोठ्याने हसवतात तर कधी त्यांच्यामुळे रडावेहि लागते. ते कधी आपल्याला एक आल्हाददायक अनुभव देतात तर कधी आयुष्यभर आपल्या आठवणीत राहतात. भावना उचमळतात, बुद्धीवर ताबा घेतात आणि कधी आपल्या मनाला आणि आपल्याला भटकायला लावतात. विचार निर्माण होतात, कधी ते दुसर्यांना विचार करायला लावतात तर कधी एखाद्याची जीवनशैलीच बदलवून टाकतात तशीच बिघडवूनही टाकतात.
निसर्गाच्या नियमाप्रमाणे या सर्व गोष्टी उद्भवतात (निर्माण होतात) आणि नष्ट पावतात, शिल्लक मागे काय राहते तर ती म्हणजे 'अभिव्यक्ती' (व्यक्त केलेली गोष्ट). हि अभिव्यक्ती खूप अनमोल आहे कारण तिच्यामध्ये या सर्व घटनांचा, अनुभवांचा, क्षणांचा, भावनांचा आणि विचारांचा एकंदरीत सार दडलेला असतो. या सर्व घडलेल्या गोष्टींचा तिने मुखवटा परिधान केलेला असतो.
[Image courtesy: Photo by Pixabay: https://www.pexels.com/photo/green-leafed-tree-near-body-of-water-414102/]
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.