परेशानीच्या काळात परेशान न होता परिस्थितीचा एकतर सामना करून टिकायचे किंवा मग संकट ओसरे पर्यन्त स्थान बदलून कुठेतरी आडोश्याला/सावलीला बसता येते का हे पाहायचे, हे सांगणारी ही ब्लॉग पोस्ट.
जगात एका बाजूला जर ऊन आहे तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला सावलीही आहे! माणसाने परेशानी च्या काळात अशाच सावलीखाली जाऊन बसायला काय हरकत आहे?
आज झेरॉक्स काढायच्या निमित्ताने भर दुपारीच बाहेर पडलो होतो आणि झेरॉक्स काढीत असतानाच मनात विचार आला की 'ऊन किती आहे!' या उन्हासोबतच काहीजणांच्या प्रत्यक्ष आयुष्यात थोडा-बहुत किंवा जास्त होत असलेला 'उन्हाळा' ही मनात डोकावला. पण लगेच दुसऱ्या बाजूला सावलीही उमगली. म्हणजेच प्रत्यक्षात फक्त ऊनच नाही तर ठिकठिकाणी निर्माण झालेली सावली ही आहेच! हे डोक्यात आले! त्यामुळे लगेच येऊन ही ब्लॉग पोस्ट तयार केली. म्हणजे परेशान माणसाने फक्त परेशानी च लक्षात घेऊन तिच्यावरच लक्ष केंद्रित करून त्या परेशानी तच परेशान न होता आयुष्यात कुठेतरी:
- त्या परेशानी ला उत्तरे पण आहेत आणि/किंवा
- त्या परेशानी पासून अलिप्त राहून/दूर जाऊन सावलीत ही बसता येते म्हणजे च कुठेतरी दिलासा देणारा आधारही घेता येतो!

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.