खास पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechchha! International Women's Day

आज जागतिक महिला दिन! स्त्री वेगवेगळ्या (शारीरिक-मानसिक) अवस्था सोसून (देखील),  कधी त्याचे भांडवल न करता, ज्या-ज्या विविध अशा भूमिका ठरवून दिलेल्या असतात,  किंवा  ज्या-ज्या विविध अशा भूमिका वाट्याला आलेल्या असतात,  त्या अगदी (यशस्वीपणे) पार पाडीत असते, त्यालाच एक दुजोरा (म्हणून की काय!) 8 मार्च हा आजचा दिवस, जागतिक 'महिला दिन'! यामध्येच एखाद्या स्त्री च्या भूमिकेतील गमक दिसून येते! स्त्रीच्या अंगी निसर्गतःच मातृत्व आहे, माया आहे, ममता आहे! संगोपन हा गुण देखील तिच्या अंगी निसर्गतः च आहे. बहुतांशी (अख्खे कुटुंबच) एखाद्या आई/बहीण/सुनेच्या भोवताली, या ना त्या कारणाने फिरत असलेले आपण बहुतांशी पाहिलेले आहे. तिच्या शिवाय काही गोष्टी घरात, कधी कधी (आणि वेळेला!), सापडूच शकत नाहीत!😊 (हा अनेकांचा अनुभव आहे!)  कुठलीही (आई, बहीण, सून अशा) स्वरूपातील 'स्त्री', घरात नसेल तर घराला घरपण नसते. स्त्री कोमल असली तरी खंबीर असते! वेळोवेळी कणखर झालेली  तिला  जगाने पाहिलेले आहे! त्यामुळे, तिचे महत्व जाणून घेणे, लक्षात ठेवणे, आणि वेळोवेळी, तिच्या जगण्याला, आणि जपण्या...

स्वप्न, वास्तव, विचार आणि तडजोड

स्वप्नांच्या मागे एखाद्या व्यक्तीचा झालेला पूर्ण-अपूर्ण प्रवास वर्णन करणारी मराठी ब्लॉग पोस्ट. Marathi blog post describing a person's complete-incomplete journey while pursuing dreams.
          'छंद माझा वेगळा' असे आपण बऱ्याच वेळेस म्हणत असतो; पण माणूस 'एक ना अनेक' अशी बरीच स्वप्ने देखील उराशी बाळगून असतो! प्रत्येक माणसाचे कळत-नकळत पणे एक ना अनेक स्वप्ने असतात, आणि त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठीच तो (स्वतः नाही म्हणाला/म्हणाली तरी) जगत असतो त्याहीपुढे जाऊन तो किंवा ती झगडत असतो/असते, प्रयत्न करत असतो/असते. या प्रयटनांतूनच जे बदल आणि स्थानांतरणे घडत असतात त्यालाच जीवनाचा यशस्वी-अयशस्वी प्रवास म्हणतात. या प्रवासतूनच माणूसकाही तरी शिकतो, चुकतो आणि पुढे जात राहतो. पण स्वप्नांचा फुलोरा त्याचा/तिचा पुनः तसाच शिल्लक राहतो.
          जॉब, करीअर, कमाई, नाती, पैसा, गरजा इत्यादी गोष्टींच्या आधारे लोकांच्या अनेक प्रकारच्या गरजा आणि स्वप्ने आहेत, असतात आणि नेहमी उद्भवत राहणार पण वास्तव नेहमी आपल्याला जड जात असतं किंबहुना त्याच्याशी जवळीक साधणं जमत नाही आणि अनेक प्रकारचे विचार मनाशी घेऊन आपण कधी यशस्वी होतो आणि कधी अपयशी! अपयशाने पुनः एकदा निराशा येते; पण निराश न होता आहे त्या परिस्थितीशी तडजोड करून पुनः एकदा एक नवीन स्वप्न घेऊन आणि नव्या जोमाने, नव्या उमेदीने त्या स्वप्नांच्या मागे धावायला पाहिजे काही अंशी मागील न मिळालेले स्वप्न विसरून जण्यातच भलाई असते किंवा आहे असे समजायला शिकले पाहिजे. पण एक मात्र नक्की:
ज्या शहरात कधीकाळी आपण आपली स्वप्ने घेऊन गेलेलो असतो! .. ते शहर आपण आयुष्यात कधीच विसरत नसतो! 💝 अशा शहरात काही अनपेक्षित मित्र/मैत्रीणी आपल्याला भेटलेले असतात. ते शहर कधी काळी आपल्याला साश्रू नयनांनी सोडावे लागलेले असते आणि त्या शहराच्या भेटीला अगदी त्याच पद्धतीने जायला आपली कधीच हरकत नसते! भलेही तिथे आता आपले शिक्षण नसते, आपला जॉब नसतो; पण आपल्या आठवणी असतात! चहाच्या, एखाद्या कॅंटीनच्या, खाललेल्या डब्यांच्या, पाणीपुरीच्या, भेळच्या, शॉपिंगच्या, कॉफी च्या, शेअरिंग ऑटो च्या, सिटि बसच्या आणि .. त्या शहराकडे जाणाऱ्या ट्रेन च्या सुद्धा!
[Photo by RatuL CR♠️: https://www.pexels.com/photo/interior-view-of-a-city-bus-at-night-29306325/]

Comments

Post a Comment

कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.