माणूस आयुष्यामध्ये व्यस्त नाहीच असे म्हणता येता येत नाही तो कशात ना कशात तरी नेहमी व्यस्तच असतो पण पैसा कमावण्यासाठी मात्र तो किशोरावस्था किंवा युवा अवस्थेच्या नंतरच कामाला लागतो पैसा व्यतिरिक्त माणूस बऱ्याच गोष्टी कमावतो जसे की नाव इज्जत प्रॉपर्टी शेती जमीन बंगला गाडी तब्येत स्वास्थ्य शरीर
शरीर कमावणे असे आपण म्हणतो परंतु याच्याही पुढे कोणाचे तरी स्नेह कमावले की नाही कोणाचा आशीर्वाद कमावला आहे किंवा नाही कोणाचे प्रेम माया ममता कमावले आहे किंवा नाही असे प्रश्न पडत असतात आणि याच्याही पुढे वेळ पडल्यावर काळजीने आपल्याकडे काही किंवा कमी जास्त अंतर कापून वेळप्रसंगी काही किंवा आवश्यक त्या गोष्टी घेऊन येणारा माणूस येणारी माणसे कमावले आहेत किंवा नाही हा प्रश्न देखील आपल्याला पडत असतो किंवा ही विचार करण्याची वेळ देखील आपल्यावर येत असते नक्कीच ती देखील एक संपत्तीच आहे आणि कामाचे आहे.

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.