‘हारणे’ आणि ‘हार मानणे’यांमध्ये फार मोठा फरक आहे… एका लढाईचा!
कधी एखादं काम सुरू करण्याआधीच मनात येतं —
“हे माझ्याने होणार नाही…”
किंवा थोडंसं अपयश आलं की लगेच वाटतं —
“बस,
आता झालं… मी नाही करू शकत.”
पण खरंच आपण हरतो का… की आपण हार मानतो?
दैनंदिन जीवन असो किंवा एखादी मोठी अचीवमेंट —
स्ट्रगल हा येणारच!
कधी काम बिघडतं, कधी अपेक्षित परिणाम मिळत नाही,
कधी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मनाला लागतात.
आणि अशा वेळी मन खचतं.
आपण थांबतो… मागे सरकतो… आणि नकळत हार मानतो.
पण लक्षात येत नाही की —
आपण अजून पूर्ण प्रयत्नही केलेले नसतात.
‘हारणे’ आणि ‘हार मानणे’
यांमध्ये खूप मोठा फरक आहे.
हारणे म्हणजे — प्रयत्न करून, लढून, शेवटी पराभव स्वीकारणे.
तर हार मानणे म्हणजे — लढाई सुरू होण्याआधीच स्वतःला थांबवणे.
हारलेला माणूस पुन्हा उभा राहू शकतो,
कारण त्याने प्रयत्न केलेले असतात.
पण हार मानलेला माणूस…
तो स्वतःच स्वतःच्या शक्यता थांबवतो.
पुढच्या वेळी जेव्हा काही कठीण वाटेल,
तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचार —
“मी खरंच हरलो आहे का… की मी फक्त हार मानतोय?”
कारण कधी कधी जिंकण्यासाठी मोठा प्रयत्न लागत नाही…
फक्त थांबायचं नसतं.


Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.