एकच गोष्ट शिकलो

यत्न यत्न केले , तासनतास झटलो , क्षण अन क्षण मोजले, दिवसेंदिवस काढले , तीळ तीळ तुटलो , उन , वारा , पाऊस , थंडी … सारे, सारे काही सोसले , पण एकच गोष्ट शिकलो … अडचणीच्या काळामध्ये कोणी साथ देत नाहीत ; आणि जे देतात ते निराळेच ! अडचणीच्या काळामध्ये एकाकी राहावे लागते आणि आपण हळूहळू मित्र , स्नेही , पाहुणे मंडळी ई . लोकांच्या विस्मरणात जातो म्हणजे त्यांना आपली आठवण येण्याचा प्रकार हळूहळू कमी होत जातो . पैसे नसतील तर तुमच्याशी नाते कोणी जोडत नाही .
दुसरी गोष्ट शिकलो ती अशी कि शेवटी खऱ्याचे खरेच होत असते आणि खोट्याच्या पदरी गोटा असतो , म्हणजे दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणीच होत असते.

Comments