पश्चाताप

पश्चाताप झाला कि पुन्हा तो गुन्हा करण्याची इच्छाच राहत नाही . कमाल आहे , जे कर्म आपण वारंवार करतो, जे कर्म करण्यापासून आपल्याला बहुदा जगातली कोणतीही व्यक्ती , गोष्ट परावृत्त करू शकत नाही ते काम एकटा पश्चाताप करतो . खरेच ज्याला पश्चाताप होतो तो भाग्यवान असतो कारण त्याला नंतर वाईट काम करण्याची इच्छाच राहत नाही .