अपयश आले कि एकेक , निरनिराळे , चित्रविचित्र , अपेक्षित , अनपेक्षित असे सर्वच अनुभव यायला सुरुवात होते अन आपण हुशार व्हायला लागतो , किंबहुना शहाणेच होतो, त्याहीपुढे म्हणायचे झाले तर अक्कलच विकत घेतो ! भोवतालचे बदलू लागले कि मग पूर्वी योग्य वाटत (भासत ) असलेल्या बहुतांश बाबी हळूहळू चूक कशा होत्या ते लक्षात यायला लागते आणि 'ती चूक पुन: नको रे बाबा ! ' अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर येते .
अपयशामध्ये सचोटीचा काळ असतो आणि अशा दिवसांमध्ये कसोटी फक्त आपलीच लागते असे नाही तर कसोटी लागते ती खऱ्या आणि खोट्याची ! त्यामुळे चिंता कशाला करायची ? अडचणीच्या काळामध्ये मी मी म्हणणारे मुखवटे दिसतात , त्यांचा खरा चेहरा समोर येतो आणि खोटे समजलेले लोक जेव्हा पुढे होऊन अगदी निरपेक्षपणे मदत करून जातात तेव्हा त्यांचे खरे मन आपल्याला दिसून येते , त्यामुळे अपयशी माणसाजवळ काही असो वा नसो एक गोष्ट मात्र असते , अपयशी माणसाजवळ शिदोरी असते अनुभवांची आणि त्या अनुभवांमुळे आलेल्या शहाणपणाची. अशी हि अपयशाची तऱ्हा आणि असा हा अपयशातून उदभवलेला खऱ्या परीक्षेचा काळ ! त्यामुळे अपयशामुळे खचून न जाता पाहा आणखी काय काय शिकायला मिळतंय ते ! कारण शेवटी अपयश म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अनुभवाच्या शाळेत मिळालेला एक प्रवेशच आहे.

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.