खास पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechchha! International Women's Day

आज जागतिक महिला दिन! स्त्री वेगवेगळ्या (शारीरिक-मानसिक) अवस्था सोसून (देखील),  कधी त्याचे भांडवल न करता, ज्या-ज्या विविध अशा भूमिका ठरवून दिलेल्या असतात,  किंवा  ज्या-ज्या विविध अशा भूमिका वाट्याला आलेल्या असतात,  त्या अगदी (यशस्वीपणे) पार पाडीत असते, त्यालाच एक दुजोरा (म्हणून की काय!) 8 मार्च हा आजचा दिवस, जागतिक 'महिला दिन'! यामध्येच एखाद्या स्त्री च्या भूमिकेतील गमक दिसून येते! स्त्रीच्या अंगी निसर्गतःच मातृत्व आहे, माया आहे, ममता आहे! संगोपन हा गुण देखील तिच्या अंगी निसर्गतः च आहे. बहुतांशी (अख्खे कुटुंबच) एखाद्या आई/बहीण/सुनेच्या भोवताली, या ना त्या कारणाने फिरत असलेले आपण बहुतांशी पाहिलेले आहे. तिच्या शिवाय काही गोष्टी घरात, कधी कधी (आणि वेळेला!), सापडूच शकत नाहीत!😊 (हा अनेकांचा अनुभव आहे!)  कुठलीही (आई, बहीण, सून अशा) स्वरूपातील 'स्त्री', घरात नसेल तर घराला घरपण नसते. स्त्री कोमल असली तरी खंबीर असते! वेळोवेळी कणखर झालेली  तिला  जगाने पाहिलेले आहे! त्यामुळे, तिचे महत्व जाणून घेणे, लक्षात ठेवणे, आणि वेळोवेळी, तिच्या जगण्याला, आणि जपण्या...

दागिना



एखाद्या व्यक्तीची थोडी-बहुत किंवा खूपच जास्त जेव्हा अनावश्यक हेळसांड होत असते आणि तो /ती कुठलाच प्रतिकार/प्रतिरोध /उपाय करू शकत नाही किंवा अशा केलेल्या गोष्टी चालत नाहीत तेव्हा अशा परिस्थितीत काय विचार मनी ठेवावा हे सांगणारी ब्लॉग पोस्ट. आवडली तर लाईक करून नक्की शेअर करा.
दागिना

आपण बहुतांशी किंवा पूर्ण चांगले असूनही केव्हा केव्हा आपल्याला उगाच, विनाकारण काही किंवा अधिक उगाच त्रास सहन करावा लागतो (किंबहुना भोगावा लागतो!) आणि (अशा गोष्टींच्या विरोधात एक प्रतिकार म्हणून/प्रतिसाद म्हणून किंवा आपले स्वतःच्या निर्दोषाचे स्पष्टीकरण म्हणून) आपण जे जे काही सांगतो किंवा जे जे काही करतो ते ते काहीच चालत नाही (किंवा परिणाम करीत नाही. पहिली गोष्ट तर आपल्या एकट्याच्या विरोधात जेव्हा जेव्हा षडयंत्र करायचे म्हणून एकापेक्षा जास्त व्यक्ती उभ्या राहतात तेव्हा तेव्हा अशा परिस्थितीत आपले काहीच चालत नाही! हेही बऱ्याच वेळा तितकेच खरे!)

आता या संदर्भात वर उल्लेख केलेल्या दोन गोष्टी आपल्या स्वतःच्या संदर्भात मान्य करणे हेही तितकेच आवश्यक आहे! म्हणजे पुढील विचार करायला सोपे जाईल आणि सोयीस्कर ठरेल.

१) चांगले असणे

२) वाईट असणे

३) कमी चांगले असणे

४) जास्त/ बहुतांशी चांगले असणे

वरील चार गोष्टींच्या आधारे स्वतःलाच एक प्रश्न विचारणे सर्वप्रथम उचित ठरेल. म्हणजे दुसरा आपल्याला किती वाईट म्हणतोय आणि त्याद्वारे आपली काही बदनामी होऊन आपल्याला काही मानसिक त्रास होत असेल तर त्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला आवश्यक तितकाच दोष देऊ शकतो; अन्यथा आपणच जर काही/जास्त/पूर्ण वाईट असु तर आपला हा वाईटपणा सांगणाऱ्या व्यक्तींना दोष देण्यात काहीच अर्थ नाही.

तर 'आपण पूर्णपणे आणि बहुतांशी वाईट (गोष्टी करीत )नाहीत ' हि गोष्ट गृहीत धरूनच पुढील गोष्टींचा आपण विचार करू.

वरीलप्रमाणे, एखादा व्यक्ती पूर्णपणे किंवा बहुतांशी वाईट नाही म्हणजे खालील दोन गोष्टी शिल्लक राहतात:

१) तो व्यक्ती अर्धा चांगला आणि अर्धा वाईट आहे.

२) तो व्यक्ती अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे बहुतांशी चांगला आहे आणि (म्हणजेच) अर्ध्यापेक्षा कमी वाईट आहे.

वरील एक क्रमांकाच्या परिस्थितीत त्या त्या व्यक्तीने माझ्याविषयी लोक कुठेतरी वाईट सांगतात असा त्रागा करून घेण्याऐवजी आपला वाईटपणा कमी करून आणखी थोडे थोडे चांगले होऊन, स्वतःमध्ये सुधारणा करून आणखी चांगले होणे सोयीस्कर ठरेल.

आता आपण 'मी बहुतांशी चांगला/चांगली आहे' असा

अशाच काही त्रासदायक गोष्टी आपण खालीलप्रमाणे विचार करू शकतो: -

१) काही लोकांद्वारे आपण चांगले असतानाही वाईट आहे अशा खोट्या बतावण्या करून इतरांजवळ सांगणे. अश्या बऱ्याच खोट्या गोष्टी सांगून आपली बदनामी करणे.
अस्वीकृती । Disclaimer

या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून प्रत्येकच गोष्टीला प्रतिकार करू नये असे सांगणे नाहीये; किंबहुना कुठल्याही अन्यायाला प्रतिकार करायलाच हवा; पण जेव्हा कुठलाही प्रतिकार करायला काहीच संधी किंवा मार्ग उपलब्ध होत नसेल तेव्हाही निराश न होता वरीलप्रमाणे विचार करायला काय हरकत आहे? असा एक प्रयत्न या ब्लॉगपोस्ट च्या माध्यमातून आहे. कृपया वरील पोस्ट वाचून कुठल्याही असह्य गोष्टींना बळी पडू नये किंवा अशा गोष्टींना प्रतिकार करणे किंवा त्यांच्या विरोधात तक्रार करणे टाळू नये. किंवा अशा गोष्टींचा पायबंद/बंदोबस्त/उपाय करणे टाळू नये.


Comments