मान्य आहे प्रत्येकजण आपापल्या इच्छा , अपेक्षा आणि महत्वकांक्षा यांसाठीच लढतोय , झगडतोय आणि प्रत्येक जन आपापल्याच कामात व्यस्त आहे . पण हे मात्र खरे आहे कि प्रत्येकाला एक मन आहे आणि त्या मनाचा आपला निराळाच विरंगुळा आहे . म्हणजे प्रत्येकाचे मन हे निराळ्याच गोष्टीमध्ये रमते . हे मन ज्या निराळ्या गोष्टीमध्ये रमते , ज्या निराळ्या गोष्टीमध्ये त्याला करमते ती गोष्ट म्हणजेच 'विरंगुळा !' हा … पण ती गोष्ट निराळी मात्र असली पाहिजे ! निराळी म्हणजे जी गोष्ट आपल्याकडून ठरलेली नसली पाहिजे . म्हणजे आपण ठरवतो कि मला हे व्हायचे आहे ते व्हायचे आहे , अशा गोष्टी म्हणजे आपण ठरवलेल्या गोष्टी. या गोष्टींमधून आपल्या समाधान मिळणार आहे हे आपल्याला माहित असते . पण एखादे आल्हाददायक गाणे कानांवर पडले कि आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो , आपल्याला आपला मनपसंद खेळ आपल्या सोबत्यांसोबत खेळायला भेटला कि एक वेगळीच मजा येते वगैरे.
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.