स्वतःच्या समस्या सोडवण्यामध्ये गुंतलेल्या व्यक्तीला इतरांच्या प्रश्नांची म्हणावी तेवढी तमा नसते. असे अजेकजण आपापल्या मार्गाने जात असताना जेव्हा इच्छा नसतानाही किंवा अनपेक्षितपणे नवीन, अनोळखी लोकांच्या भेटी होत असतात तेव्हा ती भेट हि 'वळणावरची' असते! वळणावरची यासाठी कि प्रत्येकजण आपापल्या सरळ मार्गाने जाण्याची इच्छा बाळगून असतो आणि अशा सरळ मार्गाला कुठलेही वळण असू नये हि त्या व्यक्तीची साधारण अपेक्षा असते! पण सर्वच गोष्टी मान्य करेन ते जीवन कसले! आयुष्यात टप्प्या-टप्प्यावर एखादे वळण प्राप्त होतच असते आणि त्या त्या वळणावर जेव्हा माणसे एकत्र येतात तेव्हा कुठे एकमेकांच्या ओळखी होतात.
हि वळणे पुढे ओळखीची व्हायला लागतात आणि अंगवळणी पडतात, काही वळणांची पायवाट होते तर काही वळणे क्लिष्ट अनुभव देऊन जातात. अशा वळणांवर माणसेही बरेच अनुभव देऊन जातात आणि त्यातूनच माणूस हुशार होतो, त्याला एक प्रकारची विशिष्ट समज येऊन जाते, तो पुनः आपल्या मूळ मार्गावर परततो (जशी पाखरे परततात) आणि विचार करायला लागतो.
प्रत्येकाचा मार्ग आहे आणि या मार्गाला कधी वळण, वळणे आहेत तर कधी नाहीत. कोणी या वळणाने-त्या वळणाने जात जात जीवन जगात असतो तर कोणी आपापल्या सरळ मार्गाने जीवन जगात असतो.
(कृमशः आणि या पोस्ट मध्ये कदाचित काही बदल होऊ शकतात.)

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.