
एखाद्या व्यक्तीची जी जडण-घडण झालेली आहे त्यानुसारच तो किंवा ती विचार करीत असते आणि आणि त्या जडण-घडणी वरच ती व्यक्ती समोरची गोष्ट / व्यक्ती / किंवा एखाद्या व्यक्तीद्वारे केलेली कृती ही चांगली किंवा वाईट, योग्य अथवा अयोग्य अशा पद्धतीने ठरवीत असते. त्याच्याच जोडीला इतरही काही व्यक्ती असतात आणि त्यांची पण एक विशिष्ट जडण-घडण असते आणि त्यांच्यानुसार अगोदरच्या व्यक्तीने ठरविलेल्या वाईट आणि अयोग्य गोष्टी ह्या वाईट किंवा अयोग्य नसतात तर त्या चांगल्याच असतात! म्हणजेच एखाद्या व्यक्तीने ठरविलेली अनावश्यक, अयोग्य, वाईट गोष्ट हि दुसर्या व्याक्तीसाठीही तशीच असेल असे नसते. म्हणजे आपण काहीही वेगळे किंवा चांगले करीत असलो तर काही व्यक्ती आपल्याला मूर्ख, अयोग्य, आपण तसे नाही करायला पाहिजे असे म्हणत असेल किंवा अशी अपेक्षा करून त्या दृष्टीने बघत असेल तर आपल्याला नाहक त्रास होतो आणि आपण त्या ठरविलेल्या किंवा आपण करीत असलेल्या गोष्टीबद्दल गोंधळात पडत असतो आणि आपले जे काही लक्ष केंद्रित होते ते थोडेसे किंवा जास्त विचलित होत असते.
दुसर्या बाजूला अशा व्यक्तींचा 'वाईट दृष्टीकोन' हा स्वभावानुसार किंवा भावनेनुसार असतो.
अशा परिस्थितीत आपण अशा व्यक्तीला सांगून शिकवून त्या व्यक्तीची नजर, दृष्टी आणि दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करीत असतो. काही अंशी आपण यामध्ये यशस्वीही होत असतो पण; कधी कधी काहीही सांगितले तरी अश्या प्रकारचे व्यक्ती हे आपला दृष्टीकोन सोडीत नसतात; किंबहुना त्यांची नजरच म्हणजे दृष्टी च तशी असते! अशा लोकांसाठी आपण आपला पेहराव, कृत्य, वागणूक, रहन-सहन कितीही बदलली तरी ते त्यांना खुपतेच. म्हणून अशा परिस्थितीत
'कधी कधी आपण 'सृष्टी बदलू शकतो; पण समोरचाची दृष्टी बदलू शकत नाही!'
'कधी कधी आपण संपूर्ण दृश्य बदलू शकतो पण एखाद्याचा दृष्टीकोन नाही बदलू शकत!'

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.