संयुक्तिक आणि असंयुक्तिक


संयुक्तिक आणि असंयुक्तिक

कधी कधी चार चौघांमध्ये वावरत असताना आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो, सांगत असतो; पण कधी कधी सत्य, योग्य, खरे, अचूक असेही सांगायचा योग्य येत असतो बऱ्याच वेळा ते लोकांकडून ऐकले जाते; पण कधी कधी काही काही ठिकाणी किंवा काही विशिष्ट स्थिती-परिस्थितींमध्ये सत्य, खरे, योग्य, अचूक अशा गोष्टी ऐकल्या जात नाहीत किंवा त्यांचा नेमका उलटा परिणाम होत असतो. अशावेळी माणूस मग सांगून गेल्यानंतर विचार किंवा पश्चात्ताप करायला लागतो. त्यामुळे अशावेळी काही गोष्टी खऱ्या, सत्य, योग्य आणि अचूक असल्या तरी त्या गोष्टी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये किंवा काही विशिष्ट माणसांच्या घोळक्यामध्ये सांगणे योग्य म्हणजे संयुक्तिक नसते कारण एकतर ती गोष्ट त्या ठिकाणी चालतच नसते किंवा त्या गोष्टीचा उपहास/टिंगल-टवाळी, दुर्लक्ष इत्यादी केली जाते. त्यामुळे अशा ठिकाणी किंवा अशा स्थिती-परिस्थितींमध्ये आपली गोष्ट खरी, सत्य, योग्य आणि अचूक जरी असली तरी ती संयुक्तिक आहे कीं नाही? हे पाहणे गरजेचे होऊन जाते! त्यामुळे बोलत असताना हि काळजी घेणे केव्हाही सोयीस्कर! नाही का?






Comments