२०२६ या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देणारी ब्लॉग पोस्ट.
नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झालेली आहे, त्यानिमित्ताने सरलेल्या वर्षाला निरोप देऊन आणि अनेक आठवणी आणि अनुभव गाठीशी घेऊन, विविध लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. नक्कीच या शुभेच्छा फळाला येवोत आणि जनजीवनातील बहुतांश समस्यांना उपाय मिळून ते सुस्थितीत चालावे हि कामना मनाशी बाळगून आपणां सर्वांना नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा!
सरते वर्षाला नुसते निरोप देऊन चालणार नाही तर नवीन वर्षासाठी काही नवीन संकल्प सुनिश्चित केले आहेत किंवा नाही हा मुख्य प्रश्नही शिल्लक राहतो, त्यामुळे या पोस्टच्या माध्यमातून काही-अधिक नवीन आणि चांगले संकल्प कोणते असू शकतात तो विचार आपण खालीलप्रमाणे करू शकतो.
नवीन वर्षाचे संकल्प आणि सहाय्यक गोष्टी:
मरगळ आणि निराशेची कारणे, उपाय आणि प्रतिबंध
पैश्यांच्या समस्या, गरिबी आणि बेरोजगारी
कौटुंबिक प्रश्न आणि त्यावरील तोडगे
आहार-विहार
नकळतपणे स्वास्थ्याकडे जे दुर्लक्ष होते ते होता कामा नये.
आपली आवड, पदव्या, त्यांची उपयोगिता आणि करिअर
अशा एक ना अनेक गोष्टी आपल्याला नवीन संकल्पांमध्ये जोडता येतील. आपल्याला काय वाटते ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा.
सहाय्यक गोष्टी:
वरील संकल्प ठरवीत असताना आणि पूर्ण करीत असताना नक्कीच काही-अधिक चांगल्या गोष्टींच्या सान्निध्यात राहणे गरजेचे आहे. चांगल्या गोष्टी पाहणे, ऐकणे तसेच चांगल्या लोकांचे सल्ले घेणे हेही महत्वाचे आहे. अगदी याविरुद्ध कुठलीही दिशाभूल तर होत नाही न याची पण खबरदारी घेणे तितकेच गरजेचे आहे.
आपल्याला काय वाटते ते नक्की कॉमेंट मध्ये सांगा.

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.