अनंतरंग
एक प्रतिबिंब
वैविध्यपूर्ण-उपयोगी-मनोरंजक
'अनंतरंग' हे शीर्षक 'एक प्रतिबिंब' या उपशीर्षक आणि 'वैविध्यपूर्ण-उपयोगी-मनोरंजक' या Tagline सहीत लेख/लेखन, प्रतिमा (Images)/माहितीचित्रे (Infographics), पीडीएफ फाइल्स, विडियोज किंवा अशा गोष्टींच्या लिंक्स विविध ब्लॉग पोस्टस / E-books / Books इत्यादींच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण माहिती, ज्ञान, मनोरंजन इत्यादि गोष्टी शेअर करण्यासाठी तयार केले असून या शीर्षकाच्या अंतर्गत अशा सर्व गोष्टी वाचक/दर्शक यांना या ब्लॉगच्या किंवा इतर कुठल्याही इनस्टाग्राम अकाऊंट, फेसबूक अकाऊंट, यूट्यूब अकाऊंट इत्यादि तसेच अँन्ड्रॉईड मोबाइल अॅप च्या माध्यमातून वाचायला / पाहायला मिळतील असे प्रस्तावित आहे. (प्रस्तावित याचा अर्थ असा आहे की खूप मंद गतीने संबंधित गोष्टींची निर्मिती चालू आहे आणि आतापर्यंत खूप कमी निर्मिती झालेली आहे, परंतु भविष्यात परिपूर्ण लेखन आणि निर्मिती होईल या दिशेने पण प्रयत्न चालू आहेत.)
सध्यातरी हे शीर्षक स्व निर्मित साहित्य शेअर करीत आहे; परंतु साहित्य स्वीकारण्याविषयीची आणि ते प्रकाशित करण्या विषयीची धोरणे सुनिश्चित झाल्यानंतरच ही शीर्षक एक मंच (Platform) म्हणून उपलब्ध होईल; तोपर्यंत इच्छुक साहित्य निर्माते आपले साहित्य या ब्लॉग वर प्रकाशित करण्यासाठी विनंती करू शकतात. काही निवडक साहित्य च प्रकाशित करण्यात येईल; परंतु असे साहित्य ही साहित्य पाठविणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण नाव फोटो सहित प्रकाशित करण्यात येईल; पाठविणाऱ्याची इच्छा नसेल तर असे साहित्य निनावी सुद्धा प्रकाशित करण्यात येईल. परंतु एवढी वाट न पाहता, या ब्लॉग वर कॉमेंट सेक्शन उपलब्ध असल्यामुळे इच्छुक व्यक्तींनी सरळ कॉमेंट मध्ये आपला मजकूर टाकून मोकळे व्हावे अशी अपेक्षा आहे.
साधारण मानवी मूल्ये, मानवी जीवनाशी निगडीत विविध गरजा-उपलब्धी, मानवी मन, समस्या-उपाय, त्यांना निर्माण झालेला आधार, विविध अभिव्यक्ति, आणि अशाच बऱ्याच गोष्टी (बहुतांशी एक प्रतिबिंब म्हणून) संकलित करणे आणि मांडणे हा या शीर्षका मागचा उद्देश आहे. त्याद्वारे, संपूर्ण मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषेतून केलेले लेखन हे विविध माहितीचे विविध सार्वजनिक स्रोत, इंटरनेट, गूगल सारखे सर्च इंजिन्स, सध्याचे AI तंत्रज्ञान, स्वतः चे निरीक्षण, चिंतन, मनन, मांडणी, आकडेवारी, Analysis, एक/विविध लेखक, (मागविलेले/आलेले प्रतिसाद/कॉमेंट्स/माहिती/लेख/लेखन/आकडेवारी इत्यादि), अशा विविध गोष्टींचा आधार घेऊन, तयार केलेले आहे आणि तसे करणे ही अपेक्षित आहे.
About Anantarang
Anantarang is a Marathi blog and digital publication that shares thought-based articles, reflections, cultural insights, public information, and verified updates from official sources.
This app is a WebView version of our website, created for easy access on mobile.
Published By:
Nexokee Digital Media & Publishing
Udyam Registration: UDYAM-MH-25-0039134
Parbhani District, Maharashtra, India
Nature of Content:
-
Culture & life-based writings/articles
-
Public information from official sources
-
Government updates published via publicly available channels
-
Educational, awareness-oriented content
Important Disclaimer:
This app does not represent any government department or authority.
All government-related information shown inside the app is sourced from
publicly accessible, official websites (PIB, govt portals) and used only for
informational and educational purposes.
Content Sources:
Own writings, articles, quoets, narrations, descriptions, depictions, news etc.
-
PIB Press Releases (public domain)
-
Government schemes portals
-
Public notices from official websites
-
Editorial writings by Anantarang team
Copyright Notice:
All original articles published on Anantarang remain the intellectual property of the respective authors. Unauthorized copying or reproduction is not allowed.
Contact:
rightsachin@gmail.com
आयुष्य व्यतीत करीत असताना प्रत्येक व्यक्तीला विविध अनुभव घेत घेत जगावे लागत असते, त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या पद्धतीच्या आणि तशा कृतीही कराव्या लागत असतात. त्यानुसार, संबंधित अनुभव हे कधी चांगले, उबदार, आल्हाददायक, उल्हासदायक, हवे-हवेसे तर कधी ते दिशादर्शक, मार्ग दाखवणारे, विचार करायला लावणारे तर कधी ते वाईटही असतात.
अशा अनुभवांपैकी बरेचशे अनुभव आणि बऱ्याचशा गोष्टी:
1) आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या व्यवहारातून आपोआप शेअर होत असतात आणि संबंधित लोक कळत-नकळत पणे काय समजायचे ते समजून घेत असतात किंवा
2) आपण एक व्यक्ति म्हणून (आपल्या प्रियजणांसोबत किंवा सार्वजनिक रित्या विविध माध्यमांतून) शेयर करीत असतो, किंवा
3) काही किंवा अनुभव आपण शेयर करण्याचे टाळत देखील असतो.
या आणि सभोवतालच्या अशा अनेक अनुभवां अंती आपल्या मनामध्ये (ज्यालाच आपण कधी आपले 'अंतरंग' असे देखील म्हणतो) अनेक आणि अनंत असे तरंग उमटत असतात. ही झाले आपल्या अंतरंगाच्या बाबतीत; पण बाहेरच्या जगात देखील कळत-नकळत बरेचसे तरंग हे उमटतच असतात! ते देखील आपण पाहणे गरजेचे असते आणि दोन्हींचा संयोग करून जो निर्णय घ्यायचा तो आपण ठरवायला पाहिजे.
असे तरंग (आपल्या स्वतःच्या अंतरंगातले आणि बाहेरचे देखील!), कधी आपल्याला दिसतात, कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष होते आणि कधी ते आपल्याला दिसतच किंवा जाणवतच नाहीत. अगदी याच्याच उलट असे तरंग ही आपण कधी कुणाला दिसू देतो तर कधी कुणाला (/च) दिसू देत नाही (असे असले तरी, चेहरा हा मुख्यतः आपल्या मनाचा, आपल्या (मनाच्या) अंतरंगांचा आणि शा तरंगांचा आरसा असतो! त्यावरूनच काहीजण आपल्या अंतरंगात काय (घालमेल इ.) चालू आहे किंवा नाही ते ओळखून घेतात आणि कधी आपण स्वतः हूनच असे भाव लपवतो किंवा दिसू देत नाही. म्हणजेच:
1) आपण अनुभव जशास तसे किंवा त्याद्वारे उत्पन्न होणाऱ्या गोष्टी जशास तशा कधी शेअर करीत असतो किंवा नसतो. अगदी त्याच पद्धतीने
2) अशा अनुभवांच्या आधारे किंवा त्याद्वारे उत्पन्न होणाऱ्या गोष्टींच्या आधारे आपल्या मनामध्ये/मनाच्या अंतरंगांमध्ये जे जे काही तरंग (विविध भाव, विचार इत्यादींच्या माध्यमातून) उमटत असतात, ते देखील कधी शेअर करीत असतो तर कधी शेयर करीत नसतो किंवा ते कुणाला मुद्दामहून दिसू देत नाही.
यालाच आपण व्यक्त करणे, अभिव्यक्त करणे असे म्हणत असतो आणि असेच विविध चेहऱ्यावर/चेहऱ्याच्या माध्यमातून, समजमाध्यमांवर, न्यूज च्या माध्यमातून उमटलेले विविध असे तरंग (जीवनाचे अनंत असे रंग म्हणून/गृहीत धरून, जे कधी दिसतात तर कधी शोधावे लागतात) व्यक्त करण्यासाठी असलेला हा ब्लॉग म्हणजे 'अनंतरंग' होय!
त्यानुसार, या ब्लॉगच्या आणि या मोबाइल अॅप्लिकेशन च्या माध्यमातून 'अनंतरंग' चा नक्की काय अर्थ घ्यावा हा मुख्य एक प्रश्न आहे. त्याचे उत्तर दोन माध्यमातून देणे गरजेचे आहे:
1) ही संकल्पना अगोदर 'अंतरंग' अशीच होती; पण मनाचे अंतरंग हे मोठे आहे आणि त्याचा काही ठाव नाही, ते अनंत आहे हे वास्तव डोळ्यासमोर उभे राहिले होते, त्यामुळे अनंत आणि अंतरंग ही दोन शब्द ठरले होते. त्यामुळे 'अनंत असे अंतरंग' (मग ते स्वतः चे असो की इतरांचे/इतर गोष्टींचे) असा साधारण विषय वर्ष 2013-14 सालीच ठरला होता. त्यानुसार तेव्हाच 'अनंतरंग' असा शॉर्ट फॉर्म शीर्षक म्हणून ठरविला होता.
2) परंतु त्यानंतर 'तरंग' हा शब्द सुद्धा डोळ्यासमोर आला होता, की विविध असे अनंत तरंग आपल्या मनामध्ये आणि बाहेरही उमटत/निर्माण होत असतात आणि आपण या शीर्षकाच्या माध्यमातून हा (तरंग) शब्द ही गृहीत धरून ते देखील शेअर करायचे (म्हणजेच अभिव्यक्त करायचे ही देखील एक संकल्पना या ब्लॉगच्या माध्यमातून डोक्यात आली.
3) त्यानुसार पुढील अशी एक ओळ देखील मनामध्ये निर्माण झाली होती: मनाच्या अंतरंगात उमटणारे/उमटलेले (विविध) अनंत असे तरंग. पण बाहेरचे जग देखील होतेच किंवा आहेच! त्यामुळे आपल्या मनात, तद्वतच बाहेरदेखील जे जे काही तरंग उमटत असतात ते ते शक्य तेवढे गृहीत धरणे (कधी अधोरेखित करणे) ही देखील या शीर्षकाची भूमिका ठरली.
2) परंतु प्रथमदर्शनी 'अनंतरंग' शब्द पाहिल्यावर 'अनंत' आणि 'रंग' हेच चित्र डोळ्यासमोर उभे राहत होते: म्हणजे हा ब्लॉग किंवा ही शीर्षक कोणतेतरी अनंत असे रंग च जणू मांडणार आहे असे काहीसे भासत होते. यातही काही गैर असे काहीच वाटले नाही कारण ही शीर्षक खरेच 'जीवनातील' किंवा 'जीवनात (आपण स्वतः किंवा इतरांनी) अनुभवलेले' अनंत असे रंगच मांडणार आहे.
त्यामुळे या ब्लॉग/मोबाइल अॅप्लिकेशन च्या 'अनंतरंग' या शीर्षकाच्या माध्यमातून 1) अनंत, 2) अंतरंग 3) तरंग, आणि 4) रंग असे चार अर्थ आपण घेऊ शकता.
अनंत रंग ब्लॉग/अँप/शीर्षक विषयीची काही कायदेशीर माहिती: -
लेखक: - मराठी मजकुराचे लेखक: स्वयंदीप आणि इतरही काही लेखक ज्यांचे नाव त्या त्या पोस्ट खाली येईल/येत असते/किंवा येत राहील.
हिंदी मजकुराचे लेखक: - अद्याप ठरलेले नाहीत; पण संबंधित (ब्लॉग) पोस्ट/ किंवा मजकुराखाली संबंधित लेखकांचे नाव (शक्य झाले तर प्रोफाईल, फोटो इत्यादींसहित) येईल/येत असते किंवा येत राहील.
इंग्रजी मजकुराचे लेखक: Olight Swan आणि इतरही काही लेखक ज्यांचे नाव त्या त्या पोस्ट खाली येईल/येत असते किंवा येत राहील.
संपादक: - सदरील ब्लॉगचे/अँपचे तसेच या ब्लॉग/अँप वरील संपूर्ण मजकूर, इमेजेस, व्हिडिओज, लिंक्स, फाइल्स इत्यादी गोष्टींचे संपादन हे सचिन खंदारे यांनी केलेले आहे.
प्रकाशक: - सदरील ब्लॉगचे/अँपचे तसेच ब्लॉग/अँप वरील संपूर्ण मजकूर, इमेजेस, व्हिडिओज, लिंक्स, फाइल्स इत्यादी गोष्टींचे प्रकाशन हे 'Nexokee' या रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म अंतर्गत करण्यात आलेले आहे (उद्यम रजि. नं. UDYAM-MH-25-0039134); परंतु, या ब्लॉग/अँप वरील संबंधित जे जे काही कॉमेंट्स आहेत त्या सर्वांचे प्रकाशक ते ते स्वतः कॉमेंट करणारे आहेत/असतील.
उद्देश: -
या ब्लॉगवरील लेखनाचा उद्देश स्पष्ट आहे! आयुष्यातील (स्वतःचे, लोकांचे, आणि जगाचे अंतरंग यांमधील) विविध गरजा, घडामोडी, विचार, कल्पना, अनुभव इत्यादि तरंग (ज्याला की आपण Waves/Vibrations आणि सध्या Vibes असे म्हणतो) म्हणून शोधणे आणि हेच तरंग 'जीवनात उमटलेले/दिसलेले/अनुभवलेले विविध रंग' म्हणून या ब्लॉगवर आणि याच्याच मोबाइल अॅप्लिकेशन वर किंवा शक्य झाले तर एखाद्या इबूक/पुस्तक/पुस्तकाच्या शृंखलेच्या माध्यमातून किंवा विविध यूट्यूब/Instagram च्या माध्यमातून साधेपणाने, समजेल अशा पद्धतीने शेअर करणे.
ब्लॉग/अँप/शीर्षक अंतर्गत येणारे विषय: -
या ब्लॉग/अँप/शीर्षक अंतर्गत येणारे विषय हे नक्कीच रिअल लाइफ reflections असा आहे आणि त्याअंतर्गत येणारे/असणारे विषय हे:
१. मानवी जीवन आणि त्यातील भावना, विचार, अनुभव आणि अनुभूती
२. दैनंदिन जीवनातील निरीक्षणे
३. घडामोडी
४. व्यक्तिरेखा
५. संस्कृती
६. (लोकांचे आणि इतर सजीवांचे) राहणीमान-जीवनमान, जीवन जगण्याच्या पद्धती आणि त्यापासून मिळालेली शिकवण आणि दिशा आणि मार्ग
७. सत्य घटना
८.
असे असतील तरी एकंदरीत ब्लॉग चा विषय हा नक्कीच, Fiction, कविता, धार्मिक, राजकीय, abstract ideas, काल्पनिक नसून, तो मानवी जीवनातील अनुभव, भावना आणि निरीक्षण यावर आधारित काही लेखन/निरीक्षण/नोंद/ आणि अभिव्यक्ति असा असेल.
स्वरूप: -
सदरील 'अनंतरंग' या शीर्षकाच्या अंतर्गत जे जे काही text, image इत्यादी च्या स्वरूपातील मजकूर असतील त्यांचे एकत्रित स्वरूप हे, हा ब्लॉग, एक मोबाईल वरील अँप, वाचनीय/वाचण्यायोग्य PDF File, ईबुक, आणि शेवटी शक्य झाले तर छापील पुस्तक असे असेल. अनंतरंग विषयीचे सर्व प्रश्न/लेखन/चर्चा यासाठी एका स्वतंत्र चॅट ची पण सोय आणि व्यवस्था ठेवण्याचा मानस आहे.
भाषा: -
'अनंतरंग' या शीर्षकाच्या अंतर्गत जे जे काही text, image इत्यादी च्या स्वरूपातील जो जो काही मजकूर आहे/असेल तो बहुभाषिक असेल म्हणजेच, सध्यातरी मराठी, हिंदी, आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये काही किंवा बहुतांश गोष्टी आपल्याला बघायला/वाचायला मिळतील आणि भविष्यात जर शक्य झाले तर अशा गोष्टी इतर भाषेतूनही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे पण हि गोष्ट म्हणावी तेवढी सोपी नसल्यामुळे दर्शकांना/वाचकांना गुगल ट्रान्सलेशन चाच वापर करून संबंधित आणि आपल्या भाषेत सदरील मजकूर वाचावा/प[पाहावा अशी विनंती आणि आवाहन आहे.
अशा या संकल्पनेच्या बाबतीत आपण एक दर्शक/वाचक म्हणून खाली कॉमेंट च्या माध्यमातून नक्की प्रतिसाद द्यावा आणि लाइक, सब्सक्राइब आणि शेयर नक्की करावे! धन्यवाद!
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.