जुलै च्या शेवटी शेवटी कि ऑगस्ट च्या सुरुवातीच्या आठवड्यात (लक्षात येत नाही), मी एका इंटरनेट कॅफे वर बसलो होतो, घरी पी सी नाही आणि पुस्तकांचे काम करणे आणि त्यातच नोकरीसाठी तातडीने अर्ज करणे, रीजुम तयार करणे हा माझा उद्योग असायचा. एके दिवशी असाच इंटरनेट कॅफे वर काम करत बसलो होतो, त्या ठिकाणी एक सदगृहस्त (काहीतरी काम असावे बहुदा त्याचे पण ते इंटरनेट व्यतिरिक्त असावे किंवा तो सहज भेटायला आलेला असेल किंवा त्या कॅफे मालकाचा पाहुणा असावा ) त्यांच्याच विचारात व्यस्त होऊन बसले होते आणि दुसर्या पी सी वर एक लहान मुलगा वाय सी टी गेम खेळत बसला होता. आता पाउस पडेना म्हणून हे एक सर्वांचेच टेन्शन होते आणि मी तर माझ्याच टेन्शनमध्ये, घामाघूम अवस्थेमध्ये (लाईट नव्हती आणि कॅफे इन्वरटरवर चालू होता ) काम लगबगीने करण्यात व्यस्त होतो कि अचानक त्या मुलाचा आवाज आला, "सर हि गाडी चालेनाशी झालीय!" तो बराच वेळ इतका घामाघूम होता कि त्याची गाडी अडकली होती आणि ती पुढे काढण्यासाठी त्याला काय करू सुचत नव्हते! तो अनोळखी माणूस आणि मी ओळख नसतानाही एकमेकांकडे पाहू लागलो आणि मोठमोठ्याने हसू लागलो आणि दोघेही उद्गारलो… "कोणाला कशाचे … अन कोणाला कशाचे!"
[Image courtesy: Photo by Arnie Chou: https://www.pexels.com/photo/scenic-view-of-rainforest-927414/]
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.