जीवनाच्या पडद्यावर,
अभिनय
करायला शिकले पाहिजे.
ढोंगी लोकांच्या, सोंगाड्यांमध्ये
सोंग
करायला शिकले पाहिजे !
अस्तित्व फार वाईट गोष्ट आहे ,
नाइलाजानंहि टिकवावं लागतं,
त्यामुळे कधी कधी
जन्मदात्यांशीही
लढायला शिकले पाहिजे!
असशील तू बऱ्या घरचा,
इथे काय कळा,
निर्बंध जगामध्ये गरिबीने
वावरायला शिकले पाहिजे!
कोण कोणासाठी कुठे जातोय,
माहित नसते कधी कधी,
अशा वाटेवर धक्का बसल्यास
पावले
टाकायला शिकले पहिजे !
काटकसर जेव्हा मुर्खात काढल्या जाते,
दळ भद्री लोकांकडून,
खुल्या हाताने अशावेळी
उधळायला शिकले पाहिजे !
रितेपणाची भावना,
सुकेपानाची खुण,
जेव्हा गिळून टाकते वेध,
गेलेल्या क्षणांना
उजाळा देण्यास
शिकले पाहिजे !
आंधळयांमध्ये दृष्टीचा नाद
अन बहिर्यांमध्ये आवाजाचे चित्रण,
व्यर्थ अशा प्रयत्नांमधून
विसाव्यासाठी
वेळ काढायला शिकले पाहिजे !
वेदनेच्या सागरामध्ये
संवेदनशील मासे,
झरे भेटल्यास,
खडकाचे आभार
मानायला शिकले पाहिजे !
कुंचल्यांच्या प्रयत्नामधून
साकारते ते चित्र,
जगते त्याच्यात कोण
बघायला शिकले पाहिजे !
विवरण हे काहीही असो
एक मात्र खरे,
नाईलाजाने का होईना
अस्तित्व
मात्र टिकले पाहिजे !
अस्तित्व
मात्र टिकले पाहिजे !
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.