खास पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechchha! International Women's Day

आज जागतिक महिला दिन! स्त्री वेगवेगळ्या (शारीरिक-मानसिक) अवस्था सोसून (देखील),  कधी त्याचे भांडवल न करता, ज्या-ज्या विविध अशा भूमिका ठरवून दिलेल्या असतात,  किंवा  ज्या-ज्या विविध अशा भूमिका वाट्याला आलेल्या असतात,  त्या अगदी (यशस्वीपणे) पार पाडीत असते, त्यालाच एक दुजोरा (म्हणून की काय!) 8 मार्च हा आजचा दिवस, जागतिक 'महिला दिन'! यामध्येच एखाद्या स्त्री च्या भूमिकेतील गमक दिसून येते! स्त्रीच्या अंगी निसर्गतःच मातृत्व आहे, माया आहे, ममता आहे! संगोपन हा गुण देखील तिच्या अंगी निसर्गतः च आहे. बहुतांशी (अख्खे कुटुंबच) एखाद्या आई/बहीण/सुनेच्या भोवताली, या ना त्या कारणाने फिरत असलेले आपण बहुतांशी पाहिलेले आहे. तिच्या शिवाय काही गोष्टी घरात, कधी कधी (आणि वेळेला!), सापडूच शकत नाहीत!😊 (हा अनेकांचा अनुभव आहे!)  कुठलीही (आई, बहीण, सून अशा) स्वरूपातील 'स्त्री', घरात नसेल तर घराला घरपण नसते. स्त्री कोमल असली तरी खंबीर असते! वेळोवेळी कणखर झालेली  तिला  जगाने पाहिलेले आहे! त्यामुळे, तिचे महत्व जाणून घेणे, लक्षात ठेवणे, आणि वेळोवेळी, तिच्या जगण्याला, आणि जपण्या...

निर्वात पोकळी … , निर्मित अवकाश, असणारे (कि फक्त दिसणारे) आकाश, कुठे चमकणारा प्रकाश आणि कुठे भयावह काळोख. स्थिर ताऱ्यांचे भांडार … संख्याबळ … पुंजके … ताऱ्यांची रास … अनंत अशी रास काय म्हणावे काही कळत नाही. दिपवून टाकणाऱ्या कृष्ण्गंगा, असीमित कृष्णविवरे. सूर्याची प्रचंड आग, निरंतर प्रकाश, त्याची सूर्यमाला, भोवती (त्याच्या आणि स्वतःच्या) फिरणारे शांत ग्रह, उपग्रह त्यांची अचूकता, सचोटी. निगडीत वातावरण, पृष्ठभाग, निर्मित पाणी, त्याची खळखळ, प्रवास … , प्रवाह, लाटा, त्याचा प्रचंड साठा. असणाऱ्या जमिनी , निष्क्रिय आणि क्रियाशील लोक. स्पर्धा, मिलन, निर्मितीची सुरुवात, भोवतालचा तरल पदार्थ आणि त्याच्यामध्ये जेव्हा पहिली हालचाल सुरु होते तेव्हा कळते … आपला जन्म झालाय ...

(कृमश:)

Comments