वारणानगरला एकदा सेकंड इयर ला असताना एका कम्प ला गेलो होतो तिथे लंच टाईम झालेला असल्यामुळे आम्ही सारे जेवण्यासाठी एकत्र आलेलो होतो . त्या काम्प मध्ये आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेलो होतो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे कि जिल्हा बदलला कि भाषा थोडीशी किंवा जास्त बदलत असते . त्या ठिकाणी औरंगाबादचे विद्यार्थी हि आले होते आणि मी इकडून माझ्या जिल्ह्यातून गेलो होतो . आता आपण एखाद्याला काही घे अशी विनंती करायची असेल तर 'अरे ते घे बर ', असे म्हनतो . पण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी असे मागायचे असेल तर 'ते घेशील रे ' असे म्हणतात . हि गोष्ट मला माहित नव्हती .
दुसरी गोष्ट अशी कि आमच्या इकडे जर एखाद्याला जर काही घेवू द्यायचे नसेल तर 'ते घेशील बघ !' असे म्हणतात (थोडेसे दम देवूनच म्हणतात), म्हणजे 'ते घेवू नको' असा त्याचा अर्थ , कधी कधी थोडक्यात 'ते घेशील ' असे म्हटले तर त्याचा अर्थ ते घेवू नको हो तो , त्यामुळे समोरचा म्हणतो 'नाही (कशाला घेवू !)' थोडक्यात 'ते घेशील ' हे वाक्य आमच्याकडे थोडेसे दरडावून एखादी गोष्ट न घेण्यासाठी वापरल्या जाते .
त्या लंच टाईम मध्ये जेव्हा आमचे लंच झाले तेव्हा मी पाणी प्याले आणि तिथेच पाण्याजवळ थांबलो होतो . पाण्याजवळ आहे म्हणून औरंगाबादच्या लाइन मधील एकाने मला म्हटले , "तो ग्लास घेशील रे !" त्यावर मी त्याला काय म्हणणार ? साहजिकच मी त्याला म्हणालो 'नाही रे बाबा !' हे ऐकून तो आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला ,"अरे तो ग्लास घेशील रे !" मी परत त्याला काय म्हणणार , साहजिकच आमच्या इकडच्या ट्रेंड प्रमाणे मी म्हणालो 'नाही रे बाबा !' त्यानंतर तो खूप हसला आणि म्हणाला "अरे घेशील रे म्हणजे घे !" त्यानंतर मीही खूप हसलो आणि त्याला ग्लास दिला ! अशी आहे भाषेची जिल्हा बदली !

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.