वयापेक्षा चार्म महत्वाचे !

जीवनाच्या या प्रवासात आपण हसतो, खेळतो, बागडतो, मित्र बनवतो, शिकतो कधी गंभीर होतो कधी नाराज होतो. लहानपणी आई वडील आणि मोठ्यांच्या अंगावर खेळतो, किशोर वयामध्ये कॉलेजला जातो कधी त्यानंतर कधी जबाबदारी उचलतो तर कधी नाकारतो, बरेच टप्पे आपण ओलांडत जात असतो.
असे करत करत या सर्व रगाड्यात आपले वय कधी आपल्या अपेक्षांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जाते आपल्यालाही काळात नाही , कळते मात्र एक कि आपल्याकडे कोणीतरी दुर्लक्ष करतंय , आपल्याला संधी मिळत नाहीये इ . कशामुळे ? तर केवळ वयामुळे ! बरोबर आहे. वयस्कर व्यक्तीला कमी वयाच्या व्यक्तीपेक्षा कुठे कुठे जर दुय्यमच स्थान मिळत असते ! दुसरी बाबतीत आपण याच्यासाठी बोअर असतो कि आपले केस पांढरे दिसताहेत , त्वचा सुकलेली दिसतेय , जोश कमी झालाय आणि या सगळ्या गोष्टींमुळे आत्मविश्वास कमी झालाय वगैरे ! पण एक गोष्ट काळात नाही हे फक्त वयस्क व्यक्तीच्या बाबतीतच होते का हो ? नाही . कारण ह्या गोष्टी (काही अंशी त्वचेची बाब सोडली तर ) सद्य काळात तर या साऱ्या गोष्टी तरुणांच्या बाबतीतही होताहेत . आणखी एक गोष्ट अशी कि , सगळेच वयस्क व्यक्ती जुनाट दिसतात का हो ? नाही आपण निरीक्षण केले तर बरेच असे व्यक्तीही आपणास दिसतील कि ज्यांच्यावर वयाचा काहीच परिणाम दिसत नाही . असे का ? कारण जरी त्यांचे वय जास्तीचे असेल , परंतु त्यांची कांती उजळ असते , त्यांच्या डोळ्यांत एक चमक असते , त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला नसतो इ . साहजिकच त्यांच्याकडे थोडे कमी दुर्लक्ष होते किंवा दुर्लक्ष होतच नाही . याच्यावरून आपल्याला असे दिसले पाहिजे कि एखाद्या व्यक्तीकडे इतरांचे दुर्लक्ष होते ते वयामुळे नाही तर त्याची चेतना , कांती , त्याचा आत्मविश्वास , कामातील सरसता यांच्यातील अभावामुळे ! थोडक्यात काय तर वयाची चिंता करीत बसण्यापेक्षा या गोष्टी कमवण्यामध्ये घातला तर जास्त बरे ! शेवटी आपले वय महत्वाचे नाही , आपण दिसतो कसे ? (काळे असो कि गोरे ) आपली कांती चमकदार आहे का ? आपल्या डोळ्यात ती चमक आहे का ? आपण फ़ुल्ल उत्साही आहोत का ? एखादी गोष्ट किती वेगाने , यशस्वितेने , कौशल्याने आणि सहजतेने करतो ? अशा सार्या गोष्टींमधून तयार होणारा तो चार्म महत्वाचा!

Comments