भूक एक वैश्विक सत्य




किमान सजीवांच्या तरी बाबतीत 'भूक' हेच वैश्विक सत्य आहे (किंबहुना भुकेभोवती जगातली सारी सत्ये प्रभावहीन ठरतात ). विश्वात कुठेही गेलात तरी सजीवांच्या ठायी भूक हि आढळणारच ! यालाच उलटपक्षी म्हटले तर भूक हि सजीवांच्या ठायीच आढळणार ! निर्जीवांपाशी तिचे काय काम ! म्हणजे भूक आहे तिथे जीवन आहे आणि जिथे जीवन आहे तिथे भूक आहे !
त्यामुळे शास्त्रज्ञांनी जर इतर ग्रहांवर हवा आणि पाणी शोधत बसण्यापेक्षा तिथे भुकेचे अस्तित्व आहे कि नाही हे पाहणे बरे ! म्हणजे भूकेपोटी (अर्थातच स्वच्छेने ) काही सेवन केल्या जात असेल तर तिथे जीवनाचे अस्तित्व आहे हे समजण्यास काहीच हरकत नाही !

Comments