चेहरे

आयुष्यात चेहरे बरेच पाहिले असतील आपण …
हसरे असतात कोणाचे ,
ओंजळ भरून भेटल्यामुळे असतील कदाचित , कदाचित सुखाची भावनाही असेल, विनोदावर हसत असतील आणि दुसर्यांच्या मर्मांवरही हसतात बरेच जण , कोणी पास झाले म्हणून खुश असतो आणि हसत असतो , कोणी पाहिजे आहे किंवा होते ते मिळाले म्हणूनही खुश असतो ! काही तर फक्त दुसऱ्याने हसवले आणि नाही हसले तर त्याचे मन दुखू नये म्हणूनही हसतात तर काही तर फक्त हसायचे म्हणून हसत असतात त्यांना विनोद वगैरे काही कळालेला नसतो . ज्याचे त्याचे आपले स्वत : चे कारण ! … आणि ज्याचा त्याचा आपापला स्वत: चा स्वभाव आणि आपापली स्टाईल !
असे हे हसरे चेहरे ! कधी हवेहवेसे वाटतात … तर कधी खोटारडे असतील तर नकोसेहि वाटतात !
काही चेहऱ्यांची कीव येते … तर काही चेहर्यांचा खूप राग येतो ! काही चेहऱ्यांची घृणाही वाटते कधी कधी ! का कोणास ठाऊक ? पण काही चेहऱ्यांना अर्पण हि करावेसे वाटते काही तरी किंवा सगळेच कधी कधी .
असे हे चेहरे !
आपल्याभोवती … नव्हे आपल्यासोबत !

Comments