वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात , त्या अवस्थेनुसार , वयानुसार , लिंगानुसार आणि ठिकाणानुसार वेगवेगळ्या असतात . परंतु एका गोष्टीमध्ये मात्र सर्व समान असतात ! ती समानता हि कि सर्वांना आपली अपेक्षा पूर्ण व्हावी हि अपेक्षा असते !
सर्वसाधारणपणे पाहिले तर स्त्रिया अथवा मुली यांच्या अपेक्षा वेगळ्याच असतात , पुरुष अथवा मुले यांच्या अपेक्षा वेगळ्याच असतात . त्यातही लहान , वयात आलेले , मध्यम आणि वयस्कर या सर्वांचे आपापले आणि निरनिराळे , अगदी भिन्न अपेक्षा .
आता हेच पहा ना , इंडिया वर्ल्ड कप जिंकावा अशी अपेक्षा ठेवून जिथे जीव तोडून एखादा भाऊ किंवा एखादीचा मिस्टर टी . व्ही . पाहत असतो तिथे इतर स्त्रियांना match पहायचा नसून आपली एखादी आवडती सिरियल पहायची इच्छा असू शकते ! जिथे चांगल्या निकालाची अपेक्षा एखादा विद्यार्थी ठेवत असतो तिथेच कधी कधी आसुसलेल्या नजरेने एखादा शेतकरी डोळ्यांपुढे पापण्यांच्या वर आणि हात करून आभाळाकडे पाहत असतो ! कुणाची अपेक्षा असते 'मी खूप श्रीमंत व्हावे ' तर कुणाला वाटते 'आहे तेवढीच गरिबी पुरेशी आहे , आता याच्यापुढे संकटे नको ' , काहींना वाटते शरीर संपदा कशी भरभरून व्हावी / असावी तर काहींना वाटते पुरेसे स्वास्थ्य जरी लाभले तरी उत्तम , आता हा दवाखाना आणि या यातना नको ! अशा प्रकारे काहींच्या फार भारी , उंची अपेक्षा असतात (काहींच्या तर एवढ्या उंच अपेक्षा असतात कि त्या कधी हातालाच येतील कि नाही अशी शंका मनामध्ये उमटते ), तर काहींच्या फार मध्यम अपेक्षा असतात .
कोणी इतरांवर अपेक्षा ठेवते , कोणी इतरांच्या अपेक्षा पूर्ण करते , कोणाच्या अपेक्षा आपोआप पूर्ण होतात तर कोणाचे अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये पूर्ण आयुष्य जाते ! कोणी सतत अपेक्षित उत्तरे शोधत असतात तर कोणी म्हणते निरपेक्ष राहिले पाहिजे ! कधी कधी तर अश्या अपेक्षांचे ओझे तयार होते आणि ते ओझे आपण आपल्या पाठीवर सतत वाहत असतो . त्यातही कोणाच्या अपेक्षा पूर्ण होतात आणि काहींच्या अपेक्षा तशाच राहतात . अशा या अपेक्षा , अपेक्षित आणि अनपेक्षित !
अपेक्षा आणि त्यातही सर्वांच्या (!, ?) , पूर्ण होतील कि नाही प्रश्न आहे , परंतु एक अपेक्षा जी कि सर्वसाधारण आणि बहुतांशपणे कामगार वर्गाची असते , पूर्ण व्हावी अशी नि : शंक पणे सर्वच जण प्रार्थना करतील ! ती म्हणजे … 'हाताला काम अन पोटाला भाकर' !

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.