मनाचे अंतरंग हे अनंत असते, त्याला परिसीमा नसते. मन हे कधी, कुठे, कुठल्या आणि कसल्या विषयावर, कशापद्धतीने विचार करेल हे काही सांगता येत नाही! माझ्याही मनाच्या अंतरंगात ढवळाढवळ हि अशीच निरंतर चालू असते. माझे मन कधी विनोदांवर हसते, कधी भूतकाळात रमते, कधी भविष्यकाळाचा इतका विचार करते कि खूप ताण येतो, कधी अकारण काळजी करत बसते, कधी मानवी जीवनातील दु:खाचा विचार करत बसते तर कधी व्यक्तींच्या, प्राण्यांच्या नैसर्गिक गोष्टींच्या हालचालींवर निरीक्षण करत बसते. मनाच्या अंतरंगात अशाप्रकारे बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात ज्या कधी व्यक्त होत नाहीत आणि जर व्यक्त झाल्या तर फार बरे वाटते (त्याला अनुरूप प्रतिसाद मिळाला तर जास्तच बरे वाटते!). याच व्यक्त करण्याच्या प्रक्रियेला आपण 'अभिव्यक्ती' असे म्हणत असतो आणि अशी अभिव्यक्ती आपण हृदयाच्या प्रत्येक स्पंदनातून करत असतो म्हणून याब्लॉगचे वर्णन मी' अभिव्यक्त स्पंदने' असे करण्याचे ठरवले. या स्पंदनांमधून कधी माया निघते, कधी ममता, कधी मैत्री तर कधी लळा! कधी विनोद निघतो, कधी विचार,कधी हाय निघते, कधी तत्वज्ञान ,कधी कळ तर कधी त्या कळेवर फुंकर घालणारी सांत्वना! आपल्या हृदयस्पंदनांमधून काय निघते? अशाच गोष्टी शेर करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न…माझ्यासाठी..आणि आपणां सर्वांसाठी !
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.