आपण लहान आहात कि मोठे, गरीब आहात कि श्रीमंत, या देशात राहता की त्या देशात, या धर्माचे आहात कि त्या धर्माचे, काय फरक पडतो? दैनंदिन जीवन तर प्रत्येकालाच जगावे लागते! आणि जगाव्या लागतात त्या कामना, भोगाव्या लागतात त्या यातना, घ्यावा लागतो तो आनंद आणि साहावे लागते ते दु:ख आणि करावा लागतो तो संघर्ष! संघर्ष मग तो कुठलाही असो 'सकाळी लवकर कसे उठू ?' सारखा लहान असो अथवा एखाद्या दुर्धर आजाराशी झुंजत राहण्यासारखा मोठा असो. असे अनंत (छोटे अन मोठे) संघर्ष आपण कधी जाणूनबुजून, कधी स्वेच्छेने, कधी नाईलाजाने तर कधी आपल्यालाही नकळत करत असतो.
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.