आपली गडबड काही कामाची नाही हा एकदा चांगलाच अनुभव आलेला आहे त्यामुळेच हि गोष्ट आज शेअर करावीशी वाटतेय. माणूस कधी कधी आपले काम "लवकर करा - लवकर करा" असे म्हणून समोरच्या कडे तगादा लावतो, मीही एकावेळेस असाच तगादा लावला होता आणि त्यानेही मी म्हटले तसेच काम केले पण त्यानुसार आणि त्या वेळेत माझे ते काम झालेले असल्या मुळे माझे पुढील काम होण्याची संधी लांबल्यामुळे मला अगोदरचे काम त्या कामासोबत जोडता नाही आले आणि माझे प्रचंड नुकसान झाले, मानसिक त्रास आणि लिंक तुटण्याची नौबत वेगळीच! त्यामुळे निश्चितच कुठलीही गोष्ट (पूर्ण / सुरु) करण्याची घाई करणे हि गोष्ट फार विचारपूर्वक केली पाहिजे असे वाटते. त्यानुसार मला खालील वाक्य सुचते -
आयुष्यामध्ये कुठे घाई करायची आणि कुठे करायची नाही हे कळाले कि गडबड होत नाही.
[Image courtesy: Photo by Hiếu Hoàng: https://www.pexels.com/photo/tilt-shift-lens-of-green-plants-668465/]
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.