कपडे धुवणारा व्यक्ती किंवा एखादा धोबी हा जेव्हा कपडे धुवीत असतो तेव्हा तो त्या कपड्यांना कुचीत असतो, आपटीत असतो, पिळीत असतो आणि त्याच्यातला 'मळ' काढीत असतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्यातही काही जर मळ साचलेला असेल तर आपल्याही बाबतीत तीच गोष्ट लागू होते. म्हणजेच आपल्यातला पण काही अथवा पूर्ण मळ काढण्यासाठी आपल्यालाही काहीसे 'पीळावेच' लागणार त्यामुळे मोठी, वडीलधारी मंडळी अथवा शिक्षक जर आपला कान पिळीत असेल तर त्यामागचा हेतू आपण समजून घेतला पाहिजे आणि निमूटपणे आपल्यातला 'मळ' त्यांना काढू दिला पाहिजे.
[Image courtesy: Photo by James Wheeler: https://www.pexels.com/photo/brown-wooden-dock-414612/]

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.