वळण हा आयुष्यातला लक्षात नसलेला पण खूप मोठा शब्द आहे; कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात माणसाला एक वळण लागत असते किंवा ते घ्यावे लागत असते. अशाच वळणावर आपल्याला वेगवेगळी माणसे भेटत असतात आणि वेगवेगळे अनुभव हे येत असतात.
जेव्हा तुमची आमची भेट हि वळणावरची असते तेव्हा केव्हा ना केव्हा निरोप घ्यावाच लागणार आहे! त्यामुळे आताच चांगले वागलेले काय वाईट? उगाच एकमेकांची माने दुखवून नंतर निरोप घेतल्या नंतर मनात वाईट वाटून घेण्याची पाळी स्वतःवर आणून काय उपयोग? त्यामुळे वळणावरच्या सोबत्यांनी हे लक्षात ठेवावे म्हणजे उपयोग होईल!
सरळ मार्ग आणि वळण ह्या आयुष्यातल्या ठरलेल्या गोष्टी आहेत; फक्त निवड कुठली करायची हे आपल्या हातात आहे! सरळ मार्गाने निघालात तर वळण चुकणार आणि वळणाने निघालो कि सरळ मार्ग चुकणार! त्यामुळे आपल्याला नेमके काय पाहिजे हे मनाला ठरवूनच निर्णय घेतला पाहिजे!
सरळ मार्गाने निघालोत कि मान सरळ ठेवावी लागते आणि वळण घेतले कि वाट वाकडी करावी लागते!
काही वळणे एकत्र येतात हे पण तितकेच खरे आहे.
[Image courtesly: Photo by Aleksey Kuprikov: https://www.pexels.com/photo/time-lapse-photo-of-water-falls-in-the-forest-3715436/]

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.