आयुष्यातील विविध टप्पे, अवस्था तसेच प्रवास वर्णन करणारी ब्लॉग पोस्ट.
अनेक प्रकारे आपण हा शब्द आपण वापरत असतो; म्हणजे जगलेले आयुष्य, उपलब्ध असलेले आयुष्य वगैरे.
विज्ञानानुसार नक्कीच आपले सर्वांचे आयुष्य हे उत्क्रान्त होत गेलेले आहे आणि पुढेही सुधारित आणि उत्क्रांत च असेल. पण आपण आपले आयुष्य हे कसे आहे हे फक्त आपल्या सध्याच्या स्थितीनुसारच ठरवीत असतो.
आयुष्याच्या अनेक टप्प्यात आपण असतो ज्याला आपण वय असे म्हणतो आणि त्या त्या वयात पुन्हा आपण वेगवेगळ्या अवस्थेत असतो आणि अशाच प्रकारचा प्रवास आपण करीत असतो आपण याला प्रवास यासाठी म्हणतो कि आपण सदा या ना त्या कारणाने इकडे तिकडे फिरत असतो, स्थानांतर करीत असतो आणि सतत आपले आयुष्य हे बदलत असते.

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.