दैनंदिन आयुष्य जगत असताना तसेच त्यादरम्यान विविध कामे करीत असताना, विविध ठिकाणी फिरत असताना ,विविध लोकांना भेटत असताना, त्यांच्यातील संवादांच्या दरम्यान आणि बाह्य जगातील विविध हालचालींमुळे/हालचालींमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये संपूर्ण आयुष्यात केव्हातरी/नेहमीच काही, अनेक किंवा अनंत असे तरंग उमटत असतात. हे तरंग व्यक्ती कधी कोणाजवळ तरी व्यक्त करतो किंवा कधी (नाईलाजाने/इलाज म्हणून/ स्वच्छेने/जाणूनबुजून) व्यक्त करायचे टाळतो किंवा व्यक्त करीत नाही. अंतरंगातील या अशाच ज्या 'व्यक्त-अव्यक्त' अभिव्यक्ती आहेत त्या या शीर्षकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आणि जाणार आहे.
मनामध्ये उमटलेल्या विविध आठवणी, भावना, विचार, अनुभव, निरीक्षण इत्यादी अनेक शेअर करण्यासाठी तयार करण्यात आलेला ब्लॉग, प्रस्तावित पुस्तक/पुस्तकांची शृंखला (Book Series)/मासिक म्हणून हे शीर्षक विविध वयोगटातील वाचकवर्ग नजरेसमोर ठेऊन तयार आणि उपलब्ध आहे आणि असेल.

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.