स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!
'हर घर तिरंगा' च्या माध्यमातून देशभरामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे! ठिकठिकाणी 'तिरंगा ध्वजाचे' ध्वजारोहण होत आहे. ठिकठिकाणी लहान लहान बालकांच्या हातात चिमुकला तिरंगा घेऊन पदयात्रा पाहायला मिळाल्या काही ठिकाणी देशभक्तीपर गाणेही लावलेले ऐकायला मिळाले. एकंदरीत काय तर नक्कीच ७८ वा स्वातंत्र्य दिन हा आपल्याला चैतन्याचे तद्वतच उमाळ्याचे वातावरण घेऊन आला आहे ज्याद्वारे आपण ज्यांनी ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि संघर्ष केला त्या सर्वांचे स्मरण करून 'स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!' हा नारा दिला पाहिजे. तसेच सतत काही ना काही उदात्त आणि लोकोपयोगी करून हे बलिदान व्यर्थ जाऊ नये असा संकल्प आपण आजच्या दिनी केला पाहिजे.
आजच्या या दिनाच्या माध्यमातून आपण आपल्याला सर्वांना मिळालेल्या स्वातंत्र्याची जाण ठेवली पाहिजे आणि मनाशीच एक खूणगाठ केली पाहिजे कि माझे सर्व देशवासीय सुखा समाधानाने एकत्र राहिले आणि नांदले पाहिजेत ज्यामध्ये कुठल्याही भेदभावाला तसेच एकमेकांतील वैराला थारा राहिला नाही पाहिजे जेणेकरून देशाच्या विविधतेतील एकतेला कुठल्याही प्रकारची बाधा पोचली नाही पाहिजे.
१५ ऑगस्ट २०२४, ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक
सचिन खंदारे
संपादक, अनंतरंग
https://anantarang.blogspot.com

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.