१५ ऑगस्ट २०२५. 'स्वातंत्र्य दिन!' शुभेच्छा देणारी ब्लॉग पोस्ट. Marathi blog post wishing greetings on the occasion of 15 August 2025 as 'Independence Day' of India.
आज १५ ऑगस्ट २०२५. 'स्वातंत्र्य दिन!' नक्कीच खूप गर्व वाटावा असा दिवस! आजच्या दिनीच आपला भारत इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला. पण ही स्वतंत्रता इतकी सहज आणि सोपी नव्हती, त्यामागे अनेक देशभक्त यांचे बलिदान आणि संघर्ष आहे. तोच संघर्ष आणि बलिदान लक्षात घेऊन आज विविध शाळा, कॉलेजेस, कार्यालये इत्यादि ठिकाणी आजचा हा 'स्वातंत्र्य दिन' खूप उल्हासात आणि आनंदात साजरा झाला. नक्कीच या स्वातंत्र्याचा इतिहास लोक लक्षात ठेऊन पुढील वाटचाल करतील ही अपेक्षा ठेऊन आपल्या सर्वांना 'भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या' हार्दिक शुभेच्छा!'

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.