हारणे आणि हार मानणे यातील फरक सांगणारी, संघर्ष, अनुभव आणि विजय यावर आधारित प्रेरणादायी मराठी ब्लॉगपोस्ट.
Focus Keywords: हार मानू नका, मराठी प्रेरणादायी लेख, संघर्ष आणि यश, जीवन प्रेरणा मराठी, Struggle, Failure, Success
अनेकदा जीवनातील अडचणी छोट्या-मोठ्या असतात पण कठीण असतात (... थोड्याश्या महाकठीणच असतात!😊). आपल्याला त्या नकोशा असतात; पण मुळात त्या समजायला किचकट आणि सोसायला अवघड असतात. त्यामुळे कधी कधी आपण मानानेच अशा भीषण, कठीण प्रश्न-समस्या पासून दूर राहतो किंवा त्यांच्या पासून हार मानतो. परिस्थितीने हरवण्याच्या अगोदरच आपण हरलेलो असतो आणि त्यातून नकळत पणे 'एक अनुभव' आपण गमावून बसलेलो असतो ही आपल्या लक्षातच येत नाही (ज्या अनुभवाची किंमत कधी कधी खूप जास्त असते!).
आपण एक गोष्ट विसारलेलो असतो की - हारलेला माणूस हा (भलेही हारलेला असला तरी) झगडून आलेला असतो
आणि अगोदरच हारलेला माणूस हा त्या 'लढाई' ला नको म्हटलेला असतो.
त्यामुळे,
हार मानणे आणि हारणे यांमध्ये फार मोठा फरक असतो आणि तो असतो एका लढाईचा!
एका फार मोठ्या उदासीनतेचा, नकाराचा जो की एका फार मोठ्या मजबुरीमधून सुद्धा आलेला असू शकतो.
हारणे म्हणजे प्रयत्न करून अपयश येणे किंवा प्रयत्न करून अपेक्षित परिणाम न मिळणे; पण (अगोदरच नाही म्हणणे किंवा) हार मानणे म्हणजे लढण्याआधीच माघार घेणे किंवा मानमध्येच पराभव स्वीकारणे. जी माणसे हार मानत नाहीत, ती कधीच थांबत नाहीत, सतत पुढे पुढेच जातात, अडखळतात, पडतात, उठतात... पण एक ना एक दिवस आणि कधी ना कधी जिंकतातच! तसे नाहीच झाले तर (मग) कमीत कमी शिकतात तरी! पण जी माणसे प्रयत्नानानच नाही म्हणतात ती (कधी कधी सुरक्षिततेच्या नावाखाली) स्वप्नांना, संधींना आणि पर्यायाने स्वतःला, मागे टाकतात किंवा यशापासून हळूहळू दूर जातात. म्हणूनच आणि त्यामुळेच:
त्यामुळे लढत चला, झगडत चला.
लढून हारलात तर.. ‘अनुभव’ निश्चित आहे
आणि जिंकलात तर ‘विजय’ निश्चित आहे!
(जीवनातील विविध छोट्या-मोठ्या प्रश्न-समस्यांविरुद्ध)
लढण्यापूर्वीच हार मानत जाऊ नका.
लढत राहा, (परिस्थितीशी) झगडत राहा,
लढण्याआधीच हार मानू नका; कारण
लढून हारलात तरी किमान शिकाल तरी!
म्हणूनच जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी — लढण्यातून संघर्ष आहे पण अनुभव किंवा जीत आहेच; पण माघार घेण्यातून केवळ नुकसानच आहे!
शेवटी अनुभव हि (सुद्धा) एक संपत्तीच! दुसरे काय?
अनुभव तुम्हाला मजबूत करतो, विचार परिपक्वबनतात आणि पुढच्या तयारीला लागता येते. अन्यथा पुन्हा मागासलेपण आहेच! म्हणून तुमची निवड महत्वाची आहे.
✨ अंतिम विचार
लढणं थांबलं की हार निश्चित आणि नुकसान, लढणं सुरू ठेवलं की शक्यता कायम जिवंत राहतात.
ही पोस्ट कशासाठी योग्य आहे?
उदासीन मानसिकतेसाठी हि पोस्ट उपयुक्त आहे.
🌱 अनंतरंग
विचार, अनुभव आणि जीवनातील अशाच छोट्या पण खोल गोष्टी
मांडण्याचा हा प्रयत्न.
🌐 anantarang.blogspot.com
***
Haarne, haar maanne, eka ladhai cha farak
(English Search Queries साठी चे Text)
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.