मागे एकदा पुण्याला गेलो होतो. कशाला गेलो होतो नीट आठवत नाही (म्हणजे परीक्षेला कि मुलाखतीला ते), पण तिथली एक गोष्ट मला आठवते तिथल्या व्यक्तीची भाषा! (तिथल्या म्हणजे पुण्याला अनेकजण आहेत पण जे मूळ तिथले आहेत ते; कारण बहुदा करून तिथल्याच मूळ लोकांची भाषा हि खरी पुणेरी वाटते.)
रात्री मी प्रवास करून सकाळी तिथे पोहोचलो, सकाळी फ्रेश झाल्यानंतर माझी bag घेऊन मी फिरत होतो, bag चे ओझे वाटत होते पण काय करणार, एकजनाने सांगितले कि क्लॉक हाउस आहे आणि तिथे bags ठेवतात. मी लगेच तिकडे गेलो आणि पावती फाडून माझी bag तिथेच ठेवली. संध्याकाळी येवून पाहतो तर तिथे सकाळी पाहिलेला म्हातारा व्यक्ती नव्हता तर एक म्हातारी होति. ती म्हातारी त्याची कोण होती मला काही सांगता येणार नाही. (म्हणजे बायकोही असू शकते आणि बहिण हि असू शकते. ) मी पावती त्या म्हातार्या स्त्री जवळ परत करून माझी bag देण्याची विनंती केलि.
आता तुम्ही म्हणाल यात नवीन ते काय? तर तुम्हाला सांगतो कि मी असा इकडून गेलेला, आणि तिची भाषा इतकी गोड होती! कि सांगूच नका. पुण्याची भाषा शुद्ध आहे गोड आहे असे ऐकले होते पण पहिल्यांदाच ऐकत होतो. आता झाले असे कि ती bag सापडत नव्हती आणि त्यामुळे त्या बाईने मला bag रंग विचारला. मी सरळ काळा म्हनालो. त्या बाईने फार वेळ ती bag शोधली पण काही केल्या ती bag सापडत नव्हती. ती म्हातारी स्त्री थोडी परेशान झाली होती आणि एक bag काढत तिने मला पावती दाखवायला सांगितली आणि ती bag आणि ती पावती match झाली.
आता त्या बाईने काय करायला पाहिजे होते? मला खूप खड्सावायला पाहिजे होते, पण ती काय बोलत होती ते तूम्हाला सांगतो - "हे काय?" "कित्ती चूक बोलला तुम्ही?" "bag वर लाल पट्ट्या आहेत न?" "आहेत कि नाही?" मी म्हटले हो. मग ती म्हणाली, "मग तुम्ही काळी कशी म्हणालात?" मी म्हणालो चुकलो आजी माझ्या लक्षातच नाही आलं, तर ती म्हणते, "नाही नाही हे बरोबर नाही", "मी किती परेशान झाले बरं! हो कि नाही ?" मी म्हटले हो आजी. ती म्हणाली, "हे असं नाही करायचं हं."
आता तुम्हाला सांगतो कि ती एवढे रागाने बोलत होती पण पुण्याची भाषाच अशी आहे कि तिची भाषा एवढ्या रागातही एवढी गोड आणि सुंदर होती कि माझ्यासारख्या गावाकडून गेलेल्या पोराला तिथेच सतरंजी टाकून तिचे ते रागात, चिडून बोललेले ऐकतच बसावेसे वाटत होते! खरेच पुणेरी मराठी भाषा म्हणजे पुणेरीच आहे! तिचा कुणी हाथ धरू शकत नाही!
[Image courtesy: Photo by Tabitha Mort: https://www.pexels.com/photo/red-tulip-field-607013/]

Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.