खास पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechchha! International Women's Day

आज जागतिक महिला दिन! स्त्री वेगवेगळ्या (शारीरिक-मानसिक) अवस्था सोसून (देखील),  कधी त्याचे भांडवल न करता, ज्या-ज्या विविध अशा भूमिका ठरवून दिलेल्या असतात,  किंवा  ज्या-ज्या विविध अशा भूमिका वाट्याला आलेल्या असतात,  त्या अगदी (यशस्वीपणे) पार पाडीत असते, त्यालाच एक दुजोरा (म्हणून की काय!) 8 मार्च हा आजचा दिवस, जागतिक 'महिला दिन'! यामध्येच एखाद्या स्त्री च्या भूमिकेतील गमक दिसून येते! स्त्रीच्या अंगी निसर्गतःच मातृत्व आहे, माया आहे, ममता आहे! संगोपन हा गुण देखील तिच्या अंगी निसर्गतः च आहे. बहुतांशी (अख्खे कुटुंबच) एखाद्या आई/बहीण/सुनेच्या भोवताली, या ना त्या कारणाने फिरत असलेले आपण बहुतांशी पाहिलेले आहे. तिच्या शिवाय काही गोष्टी घरात, कधी कधी (आणि वेळेला!), सापडूच शकत नाहीत!😊 (हा अनेकांचा अनुभव आहे!)  कुठलीही (आई, बहीण, सून अशा) स्वरूपातील 'स्त्री', घरात नसेल तर घराला घरपण नसते. स्त्री कोमल असली तरी खंबीर असते! वेळोवेळी कणखर झालेली  तिला  जगाने पाहिलेले आहे! त्यामुळे, तिचे महत्व जाणून घेणे, लक्षात ठेवणे, आणि वेळोवेळी, तिच्या जगण्याला, आणि जपण्या...

तोल


दैनंदिन आयुष्यामधील कुठलीही (विशिष्ट) उंची गाठण्याच्या अगोदर त्याठिकाणी 'तोल/बॅलेन्स' सांभाळण्याची क्षमता/कुवत आणि कला आपल्याकडे आहे किंवा नाही हे तपासायला लावणारी ब्लॉग पोस्ट.
जमिनीवर पडण्याची भीती नसते; उंचावर गेल्यावरच तोल सांभाळावा लागतो!
आयुष्यातील वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून मार्गक्रमण होत असताना/करीत असताना प्रामुख्याने दोन प्रकारच्या व्यक्ती लक्षात येत असतात: एक म्हणजे जबाबदार आणि दुसरी म्हणजे बेजबाबदार. जबाबदार व्यक्ती कुठलाही निर्णय घेत असताना आधी मागचा-पुढचा आणि सविस्तर विचार करूनच तो निर्णय घेत असते! बेजबाबदार व्यक्ती मात्र कसाही, कुठेहि आणि कोणताही निर्णय घेऊन मोकळी होत असते आणि बऱ्याच वेळा नुकसान होऊन पश्चातापाचीही वेळ तिच्यावर येत असते. त्यामुळे तुम्ही एक जबाबदार व्यक्ती असाल तर आपला तोल किंवा बॅलेन्स कुठे जात तर नाही ना? या गोष्टीचा विचार करणे खूप गरजेचे ठरत असते! यासंदर्भात दुसरी गोष्ट उद्भवते ती म्हणजे:
'आपण नेमके कशासाठी झगडत असतो?' ते.
आपण झगडत असतो आपल्या दैनंदिन उपजत आणि निर्माण झालेल्या इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यासोबतच आपल्या महत्वाकांक्षांसाठी. या तिन्ही गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपली सततची धडपड सुरु असते आणि या धडपडीच्या माध्यमातून आपण जवळपास शक्य तेवढ्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. (त्यातल्या काही इच्छा, आकांक्षा ह्या पूर्ण होत असतात तर (अपवादात्मक आणि अडचणींच्या परिस्थितींमध्ये) काही किंवा जास्त इच्छा, आकांक्षा आणि गरजा राहून जात असतात हा भाग देखील समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे!) परंतु, एवढे सगळे मिळूनही काही गोष्टी शिल्लक राहतात त्या म्हणजे कि 'मला काहीतरी जास्तीचे पाहिजे.', काहीतरी आणखी चांगले पाहिजे असे वाटणे. काहीतरी आणखी आल्हाददायक/सोयीस्कर पाहिजे असे वाटणे. आपण आपले दैनंदिन जीवन अगदी सुकरपणे जगत असतो पण अशा प्रकारच्या अनेक सुप्त इच्छा नकळतपणे उराशी बाळगून आपण बहुदा सर्वच जगत असतो. (आणि यालाही एक कारण आहे कि त्या गोष्टी आपण कुठेतरी पाहिलेल्या असतात; अन्यथा अशा इच्छा आपण कदाचित कधी बाळगल्याच नसलत्या.)
उदा. घरी खायला असतानाही कुठेतरी हॉटेल मध्ये चमचमीत खायला जावेसे वाटणे, स्वतः जवळ चांगले कपडे असतानाही आणखी भरजरी कपडे (उदा. सूट, टाय, इत्यादींसारखे कपडे) असावे वाटणे. चांगली नोकरी असतानाही आणखी मोठ्या पदावर जावे असे वाटणे. टू व्हिलर असून सुद्धा फोर व्हिलर असावी असे वाटणे. साधारण घर असतानाही आणखी कुठेतरी प्लॉट आणि त्या प्लॉटवर एक बंगला असावा वाटणे, विमानांमधुन एकदा तरी प्रवास करावासा वाटणे. चांगले मोठे यश मिळविणे. यालाच आपण प्रगती आणि यश म्हणत असतो आणि या दोन गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत असतो; परंतु हि प्रगती करीत असताना, हे यश मिळवीत असताना किंवा या/अशाच गोष्टींचा मागोवा घेत असताना आपले स्थान बदलत असते आणि यापायी आपण जर काहीश्या किंवा जास्त उंचावर गेलो कि जाणवते कि कुठेतरी तोल सांभाळण्याची गरज भासत आहे वगैरे.
अशा एक, काही, जास्त किंवा अनेक इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जेव्हा आम्ही झगडायला लागतो तेव्हा त्याला महत्वाकांक्षा असे म्हणतो आणि अशा प्रकारच्या महत्वाकांक्षाच आपल्याला उंचावर नेऊन बसवत असतात! पण थोड्याश्या (अपेक्षित/अनपेक्षित) उंच/उच्च/चांगल्या ठिकाणी गेल्यावरच कळते कि मी जे सामान्य खात होतो/ मी ज्या सामान्य गोष्टी करीत होतो/ मी ज्या सामान्य स्थानावर होतो/मी ज्या सामान्य कामावर होतो (इत्यादी), त्या ठिकाणी मला कसल्याच प्रकारचे टेन्शन नव्हते पण आता मात्र मला जबाबदाऱ्या जरा जास्तीच्या येऊन पडलेल्या आहेत आणि त्यायोगे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सामंजस्याने आणि तोल सांभाळून कराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत व्यक्तीला प्रत्येक पाऊल 'आपण पडणार तर नाही ना?/आपण किंचित किंवा जास्त खाली तर येणार तर नाहीत ना?'/आपण घसरणार तर नाही ना?/आपला पायउतार तर होणार नाही ना? हि काळजी घेऊनच टाकावे लागते. म्हणजेच,
आपण जमिनीवर आहोत तोवर ठीक आहे पण (थोडेसेदेखील) उंचावर गेल्यावर तोल सांभाळावा लागतो; अन्यथा पडण्याची भीती असते.
प्रगती आणि यशाचेही तसेच आहे! प्रगती किंवा यशाच्या उंच उंबरठ्यावर जाऊन खाली पाहण्याचा प्रयत्न/मोह केल्यास एकतर डोळे फिरतात किंवा खाली पडण्याची भीती हि कळत-नकळतपणे नक्कीच वाटत असते.
कुठलेही उंच ध्येये गाठण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण एक कॉमन गोष्ट अपेक्षितो आणि ती म्हणजे 'यश'! या यशासाठीच हि सारी धडपड आहे; यश मिळविण्यामागे साधारण पुढील गोष्टी उद्भवत असतात किंवा कारणीभूत ठरत असतात त्या म्हणजे:
१) गरज
२) महत्वाकांक्षा
गरजेपोटी उंची गाठणे ठीक आहे; परंतु अतिउत्साहापोटी, अतिध्यासापोटी तसेच अति महत्वाकांक्षेपोटी मिळालेल्या यशाची उंची हि देखील तेवढीच मोठी असते आणि या उंचीवरून माणसाला खाली जमिनीकडे पहिले तरी डोळे फिरल्यासारखे होतात मग तोलाचे काय? तो तर खूप चाणाक्षपणे सांभाळावा लागतो.
जेव्हा आपण एखादे मोठे यश मिळवीत असतो आणि जसजसे आपण उंचावर जात असतो तसतसे आपल्याला तोल सांभाळावा लागतो म्हणजेच बहुतांश गोष्टी सांभाळूनच विविध कार्ये करावी लागत असतात! अन्यथा सतत उंचावरून खाली पडण्याची शक्यता आपल्याला भेडसावत असते. शिवाय उंच ध्येये गाठत असताना जी दमछाक होते ना, ती फक्त आणि फक्त त्या ध्येये गाठणाऱ्या लोकांनाच ठाऊक असते!
थोडक्यात काय? तर आपल्याकडे जेवढे बॅलेन्स/तोल सांभाळण्याची कला/क्षमता आहे (आपण किती सक्षम आहोत हे पाहून) तेवढीच उंची गाठण्याचा प्रयत्न करावा! किंवा कुठलीही उंची गाठण्याच्या अगोदर त्याठिकाणी तोल सांभाळण्याची आपली क्षमता आधी तयार करून घ्यावी.
एखाद्या किचकट परिस्थितीमध्ये स्वतःचे संतुलन ढळते किंवा घसरते का? आणि तसे होत असेल तर तो देखील विचार करणे संदर्भात आवश्यक ठरते.






Comments