इंग्लिश स्पीकिंग/स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी उपयुक्त गोष्टी/मटेरियल (साहित्य/संसाधने) | Spoken English/English Speaking Marathi Resources (Material)
1. पार्श्वभूमी
शैक्षणिक तसेच जॉब/नोकरीचा शोध आणि दैनंदिन कामकाज इत्यादि तीन प्रकारे वाटचाल करीत असताना, 'इंग्रजी' या भाषेचा कुठे ना कुठेतरी संबंध येतच असतो आणि हा संबंध फक्त लिहिणे आणि वाचने एवढ्या पर्यंतच साधारण खुंटलेला असतो. त्यापुढे हा संबंध कधी कधी फार पुढची झेप घेत असताना 'इंग्रजीतून बोलणे' असा होत असतो आणि त्या ठिकाणी मात्र बहुतांश आपल्या सर्वांची गोची होऊन बसलेली असते; कारण आजपर्यंत आपण कधी आणि केव्हाच इंग्रजीतून बोलण्याचा सराव किंवा अभ्यास परिपूर्ण पणे केलेला नसतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन ही ब्लॉग पोस्ट बनविण्याचा प्रयत्न आहे; ज्यामध्ये की 'इंग्रजी बोलणे' ही कौशल्य आत्मसात करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी (म्हणजेच पुस्तके, विडियोज, इमेजेस, कोर्सेस, लिंक्स इत्यादि) उपयोगी आहेत/ठरतात शेअर करणे अपेक्षित आहे.
सर्वप्रथम 'मराठी' आपली मायबोली आहे आणि तिचा आपल्याला सार्थ अभिमान आहे या गोष्टीने आपण सुरुवात करू आणि त्यानंतर 'इंग्रजी' किंवा 'इंग्रजी बोलणे' शिकायलाच पाहीजे का? या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे.
[कदाचित आवडेल अशी पोस्ट: अभिव्यक्ती ]
2. 'इंग्रजी भाषा' किंवा 'इंग्रजी भाषा बोलणे' शिकायलाच पाहीजे का?
याचे उत्तर तीन भागांत देणे गरजेचे आहे:
1) गरज नसेल तर इंग्रजी भाषा शिकावी ही कुठल्याच पद्धतीने गरजेचे नाही.
2) गरज असेल तर मात्र इंग्रजी भाषा किंवा इंग्रजी भाषा बोलणे शिकायला काहीच हरकत नाही.
3) त्या भाषेतील कुठलाही मजकूर/साहित्य इत्यादि वाचून/ऐकून/पाहून समजून घ्यायचा असेल तर ही भाषा/बोलणे शिकायला काहीच हरकत नाही.
थोडक्यात काय? तर विशिष्ट संवाद साधण्यासाठी ती-ती संबंधीत भाषा येणे कधी-कधी गरजेचे होऊन बसते. म्हणून इंग्रजी भाषा देखील गरज असताना व्यवस्थित पणे येणे गरजेचे असते. याच गोष्टीला मदत करणाऱ्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत.
2. अॅप्स
1. Hello English
2. Duolingo
3.
3. यूट्यूब विडियोज
4. ऑनलाइन कोर्सेस
5. ऑफलाइन कोर्सेस
6. पुस्तके
1. हासुरे यांचे पुस्तक
2. नवनीत चे पुस्तक
3. रपीडेक्स चे पुस्तक
7. ईबुक्स
1. बालभारती ची काही उपयोगी पुस्तके
2. NCERT ची काही उपयोगी पुस्तके
3. इतर पुस्तके
8. PDF फाइल्स
[कदाचित आवडेल अशी पोस्ट: सवय ]
.png)
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.